येवल्यात ढगाळ हवामानामुळे नागरिकांना दिलासा
By Admin | Published: May 19, 2014 07:18 PM2014-05-19T19:18:07+5:302014-05-20T00:11:16+5:30
येवला : उष्म्याने हैराण झालेल्या येवलेकरांना ढगाळ वातावरणामुळे दिसाला मिळाला आहे. १९ मे लग्नाची दांडगी तारीख होती. मंगलाष्टके म्हटली जात असताना वर्हाडी मंडळीचे लक्ष मात्र ढगांकडेच होते. परंतु पावसाने लग्नात व्यत्यय न आणल्याने सार्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

येवला शहर व तालुक्यात १९ मे रोजी सर्वाधिक लग्ने होती. सकाळपासूनच सारे रस्ते गजबजले होते. आकाशात ढग जमा झाले होते. वर्हाडीमंडळी पावसाचा व्यत्यय नको म्हणून मुहूर्ताच्या अगोदरच लग्न लावण्याचीदेखील घाई करीत होते. पण अखेर निसर्गाने वर व वधू पित्यांसह वर्हाडीमंडळींना दिसाला दिला.
वादळी वार्याने शनिवारी व रविवारी येवला तालुक्यात चांगलीच हजेरी लावली. पन्हाळसाठे परिसरात शिवराम बोडके यांच्या घराची वरंडी वादळी वार्याच्या तडाख्याने पडल्याने चार लोक जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली व घराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
व्यावसायिक नाराज
नागरिकांना कमालीच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु याचा रसवंतीगृह व आइस्क्रीम विक्री व्यवसायाला फटका बसल्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. १० जूनपर्यंत रसाच्या दुकानासह आइस्क्रीमचा धंदा तेजीत होता. परंतु अचानक थंडावा आल्याने या धंद्याला मंदीचे सावट आले आहे.