शेतमजुरांवरील उपचारांमुळे सृष्टीदोष झाले दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 06:07 PM2019-02-21T18:07:52+5:302019-02-21T18:08:21+5:30
नांदगांव : एखादी घटना माणुसकीला जागी करून जाते तसेच काहीसे कुंदलगाव (ता.चांदवड) येथे घडले. शेतात निंदणी करणाऱ्या महिलेकडून तण समजून कांदेच उपटले गेले. या तिच्या चुकीमुळे शेत मालकाचा पारा चढला. डोळ्यांना निटसे दिसत नसल्याने तिच्याकडून ही चूक झाली. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या शेतमालक पंकज खताळ यांनी शोध घेतला असता ग्रामीण भागात अशा अनेक महिला, पुरुष शेतमजूर व लहान मुले आहेत की ज्यांची नेत्र विकारामुळे प्रगती खुंटली असल्याचे दिसून आले.
(संजीव धामणे)

खताळ यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली. सर्वांनी नेत्र पिडीतांसाठी काम करायचे ठरवले. आणि त्यातून उभे राहिले नेत्र तपासणी अभियान. नेत्र पीडितांना कशी मदत करता येईल यावर विचारमंथन सुरु असतांना, पंकज यांची पुण्याच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी भेट झाली. नेत्र शस्त्रक्रि या मोफत करून देण्याचा करार हॉस्पिटल व खताळ यांच्यात झाला. १४ आॅक्टोबर २०१८ ते १७ फेब्रुवारी २०१९ या पाच महिन्याच्या कालावधीत अविश्रांत पद्धतीने काम करण्यात आले. १४ आॅक्टोबरपासून दररोज सकाळी पंकज खताळ व डॉ. राजीव खान सैय्यद यांची टीम खेडोपाडी जाऊ लागली. नेत्र तपासणी करू लागली.
नांदगाव तालुका, मालेगाव व चांदवड तालुक्याचा काही भाग यातल्या १५० गावांमध्ये एकूण २३० नेत्र तपासणी शिबीरे आयोजित करण्यात आली. मनमाड शहरात २८, नांदगांव शहरात १६ व ग्रामीण भागात १८६ शिबिरांमधून ४७५०० रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली गेली. अवघ्या चार महिने व चार दिवसात हे मोठे काम, अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने पूर्ण करण्यात आले. तपासणीच्या दिवसापर्यंत आपली अधू दृष्टी हा नशिबाचा भाग मानून
दिसेल तेवढे जग अनुभवणाºया शेकडो लोकांना चष्मे देण्यात आले. १३८८ मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रि या पुणे येथे देसाई हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. बस भरेल एवढे पेशंट झाले कि, शस्त्रक्रि येसाठी पुण्याला रवाना व्हायचे. नंबरचा चष्मा संपूर्णपणे मोफत देण्यात आला. सर्व काही मोफत दिल ेगेले. समाजरुण म्हणूनच शस्त्रक्रि येनंतर रु ग्णांना घरपोच सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मोतीबिंदुच्या शस्त्रक्रि येसाठी लेन्सची आवश्यकता असते. प्रत्येकी सुमारे ८५०० रु . किंमतीच्या लेन्स, १३८८ रुग्णांच्या डोळ्यात बसविण्यात आल्या. हा सर्व खर्च खताळे कुटुंबीयांनी केला. येवढेच नव्हे तर तिरळे डोळे व जन्मजात नेत्र दोष असलेल्या सहा अल्पवयीन मुलांच्या शस्त्रक्रि या याच कालावधीत मोफत करण्यात आल्या.
या मोहिमेकरीता डॉ. तुषार भाकरे, डॉ. अय्याज शेख, प्रमोद साठे, अजित यादव, राजेंद्र कागलकर, मधु खताळ, समीर गुंजाळ, डॉ. सागर कोल्हे, सुदर्शन कोल्हे, अक्षय खताळ आदींनी परिश्रम घेतले.