‘शब-ए-बरात’निमित्त पूर्वजांचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:02 AM2019-04-22T01:02:13+5:302019-04-22T01:02:35+5:30

‘शब-ए-बरात’ या पवित्र रात्रीच्या औचित्यावर मुस्लीम बांधवांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कब्रस्तानांमध्ये हजेरी लावून नातेवाइकांच्या कबरींवर पुष्प अर्पण करत फातिहा पठण केले.

 Remembrance of ancestors 'Shab-e-Barat' | ‘शब-ए-बरात’निमित्त पूर्वजांचे स्मरण

‘शब-ए-बरात’निमित्त पूर्वजांचे स्मरण

Next

नाशिक : ‘शब-ए-बरात’ या पवित्र रात्रीच्या औचित्यावर मुस्लीम बांधवांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कब्रस्तानांमध्ये हजेरी लावून नातेवाइकांच्या कबरींवर पुष्प अर्पण करत फातिहा पठण केले. यावेळी रात्री उशिरापर्यंत कब्रस्तानांमध्ये समाजबांधवांची वर्दळ पहावयास मिळाली. तसेच मशिदींमध्येही सामूहिक नमाजपठणासाठी गर्दी उसळली होती.
इस्लामी कालगणनेत सलग तीन रात्री एकापाठोपाठ येतात. शब-ए-मेराजनंतर शब-ए-बरात ही दुसरी रात्र साजरी केली जाते. रमजान पर्व काळात शब-ए-कद्र ही रात्र साजरी केली जाते. या रात्रींचे आगळेवेगळे महत्त्व व वैशिष्ट आहे. शब-ए-बरात या रात्री पाप-पुण्याचा लेखाजोखा अल्लाहच्या दरबारी सादर केला जातो, असे धर्मगुरू सांगतात. या रात्री मुस्लीम बांधव आपापसांत एकमेकांची क्षमा मागत प्रार्थनेत आठवण ठेवा, असे असे सांगताना दिसून आले. अनेकांनी व्हॉट््स अ‍ॅपच्या माध्यमातून आपला ‘माफीनामा’ मित्रपरिवाराला पाठविला. यामुळे शहरातील मुस्लीम बहुल भागात सोशल मीडियावर शब-ए-बरातची चर्चा होताना दिसून आली.
सायंकाळपासून जुने नाशिक, वडाळागाव परिसरात शब-ए-बरातची लगबग पहावयास मिळत होती. सायंकाळपासून रात्रीपर्यंत शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठण मुस्लीम बांधवांकडून केले जात होते. दरम्यान, धर्मगुरूंनी प्रवचनातून शब-ए-बरातचे महत्त्व विशद क रत मार्गदर्शन केले. जहांगीर क ब्रस्तानमध्ये पूर्वजांच्या स्मरणार्थ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मौलाना मुश्ताक यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दर्गा परिसराला यात्रेचे स्वरूप
जुने नाशिकमधील हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांची बडी दर्गा, आनंदवली येथील हजरत सय्यद रांझेशाह बाबा दर्गा, पांडवलेणीजवळील हजरत सय्यद मलिकशाह हुसेनी बाबा यांच्या दर्ग्यांवर भाविकांनी प्रार्थनेसाठी गर्दी केली होती. यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांनी दर्ग्यांमधील मजारशरीफवर पुष्प, अत्तर, गुलाबजल अर्पण करत फातिहा पठण केले. पहाटेपर्यंत भाविकांची रेलचेल दर्ग्यांच्या आवारात पहावयास मिळाली. दरम्यान, वरील सर्वच ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title:  Remembrance of ancestors 'Shab-e-Barat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.