सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘स्मरण कविसंमेलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:29 AM2019-05-20T00:29:39+5:302019-05-20T00:30:55+5:30
नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हा कार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.
नाशिक : नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हा
कार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी दिलीप पाटील म्हणाले की, अनेक विद्वानांनी कवितेची व्याख्या करून ठेवली असली, तरी ज्याप्रमाणे सर्व धर्मांचे सार मानवतेत असते, तसेच कवितेचे सारतत्त्व सत्यात असते, असेही पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, कविता कल्पनेत रमत नाही. ती कधी आनंदाची बाग असते, तर कधी धगधगते वास्तव असते. ‘जंगले तुटतील, नद्या आटतील, डोळ्यांतही शिल्लक नसेल पाणी, आपल्याच कर्माने आपणच गाऊ उन्हाची गाणी’ या कवितेच्या ओळी सादर करीत त्यांनी भविष्यातील दुष्काळी स्थितीवर भाष्य केले.
ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी ‘स्वप्न’ ही कविता सादर केली. तत्पूर्वी त्यांनी शोकसभेऐवजी कविसंमेलन आयोजित केल्याचे सांगितले. येत्या वर्षभरात कवी भीमराव कोते यांच्या ‘माणसांच्या कविता’ प्रसिद्ध व्हाव्यात, तीच त्यांना आदरांजली ठरेल, अशी अपेक्षाही पाठक यांनी व्यक्त केली.
कविसंमेलनात कवी सुमती पवार, कविता बिरारी, प्रमोद कुलकर्णी, भारती देव, कमलाकर पाटील, प्रा. अरु ण सोनवणे, राधाकृष्ण साळुंके,
मुुकुंद गायधनी, विजय थिगळे,
अलका कुलकर्णी, नितीन गाडवे, जनार्दन देवरे, प्रशांत केंदळे,
सत्यजित पाटील, चंद्रशेखर सावरे, किरण मेतकर, श्रीकांत चवरे, रमेश आव्हाड, दत्तात्रय दाणी, संदीप देशपांडे यांनी कविता सादर केल्या.
भावना कुलकर्णी व आकाश
कंकाळ यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा. डॉ. वेदश्री थिगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा. डॉ. विलास औरंगाबादकर, जयप्रकाश जातेगावकर, धर्माजी बोडके, देवदत्त जोशी यांच्यासह रसिक उपस्थित होते.