ठाणगावी शौर्यदिनी वीरांचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:40 PM2019-01-16T17:40:04+5:302019-01-16T17:40:59+5:30
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने पानीपत लढाईत वीरमरण आलेल्या शूरविरांना शौर्य दिनी आदरांजली वाहण्यात आली.
प्रगतशील शेतकरी देवराम भोर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास अर्जुन आव्हाड, रामदास भोर, वंसत आव्हाड, रविंद्र भोर आदी उपस्थित होते. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या रणसंग्रामात मराठी शूरविरांना वीर मरण आले म्हणून हा दिसस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सागर भोर यांनी सांगितले. ग्रामस्थांच्यावतीने पानिपतच्या लढाईत मरण आलेल्या वीरांना स्मरण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी शिवाजी शिंदे, सावकार आमले, राहुल काकड, संदीप आमले, अरूण भोर, अनिल आव्हाड, राजेंद्र आव्हाड, शंकर आमले, समाधान कुंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. रामदास भोर यांनी सुत्रसंचालन केले.