शासनाच्या जागेवरील अतिक्र मण हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:18 AM2018-05-30T00:18:44+5:302018-05-30T00:18:44+5:30

आडगावमधील समाजकल्याण वसतिगृहाच्या मागील सरकारी जागेवरील अतिक्र मण येथील रहिवाशांनी स्वत:हून काढून घेतल्याने संघर्ष टळला. या अतिक्र मणामुळे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या बांधकामास अडथळा होत असल्याची तक्रार होती. कारवाईप्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Removal of encroachment on government premises | शासनाच्या जागेवरील अतिक्र मण हटवले

शासनाच्या जागेवरील अतिक्र मण हटवले

Next

आडगाव : आडगावमधील समाजकल्याण वसतिगृहाच्या मागील सरकारी जागेवरील अतिक्र मण येथील रहिवाशांनी स्वत:हून काढून घेतल्याने संघर्ष टळला. या अतिक्र मणामुळे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या बांधकामास अडथळा होत असल्याची तक्रार होती. कारवाईप्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  आडगावमधील समाजकल्याण वसतिगृहाच्या मागील सरकारी जागेवर अनेक वर्षांपासून मोलमजुरी करणारी अनेक कुटुंबे पत्र्याची कच्ची घरे उभी करून वास्तव्य करीत होती. सदर जागा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यालयासाठी प्रस्तावित होती. कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी सदर घरांचा अडथळा असल्याने मंगळवारी (दि. २९) सकाळी १० वाजेच्या सुमारास माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात हजर झाले. सदर अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केल्यानंतर रहिवाशांनी स्वत:हून सर्व अतिक्रमण काढून घेतले. त्यानंतर उर्वरित छोटे-मोठे बांधकाम जेसीबीच्या मदतीने हटविण्यात आले. यावेळी सचिव आर. आर. मारवाडी, सहायक पोलीस उपआयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्यासह राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी, मनपा अतिक्र मण निर्मूलन पथकाचे कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
लवकरच होणार कामाला सुरुवात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे. आडगाव येथे पाच ते सात एकर जागेवर इमारत साकारण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून दहावी, बारावी परीक्षा मंडळ भाडेतत्त्वावरील इमारतीत कार्यरत होते. मंडळाच्या हक्काच्या इमारतीसाठीही अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. मंडळाचे कार्यालय द्वारका चौकाजवळील वाणी हाउसमध्ये भाडेतत्त्वावर आहे. आडगाव येथील या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याने हे बांधकाम प्रलंबित होते. सदर बांधकाम मंगळवारी हटविण्यात आल्यानंतर बांधकामासाठी असलेला अडथळा दूर झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
अशा असणार सुविधा
नव्या इमारतीत पार्किंगसाठी मोठी जागा, मीटिंग हॉल, पेपर सेटिंग हॉल, मुख्याध्यापकांसाठी वेटिंग हॉल, मूल्यांकन स्टडी हॉल यांसह अद्ययावत सोयी-सुविधा व गार्डन अशा सुविधा असणार आहेत. या इमारतीत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचे कार्यालय सुरू होणार आहे.

Web Title: Removal of encroachment on government premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा