धरणातून गाळ हटविल्यास टळेल महापुराचा धोका

By admin | Published: May 16, 2017 11:43 PM2017-05-16T23:43:11+5:302017-05-16T23:43:36+5:30

पर्याय : गोदाप्रेमी समितीने दिले निवेदन

Removal of the mud from the dam will be the risk of the flood | धरणातून गाळ हटविल्यास टळेल महापुराचा धोका

धरणातून गाळ हटविल्यास टळेल महापुराचा धोका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातून
वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी गंगापूर धरण आणि गोदापात्रातील गाळ काढण्याची सूचना
गोदाप्रेमी नागरी सेवा समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. गाळ काढल्यास जलसाठवण क्षमता वाढून पुराचा धोका
टळू शकेल, असे निवेदनात म्हटले आहे.
गेल्या वर्षी ३ आॅगस्टला गंगापूर धरणातून गोदापात्रात ४२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु त्याचवेळी अहल्यादेवी होळकर पुलाखाली ७५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. म्हणजेच ३२ हजार ५०० क्यूसेक अतिरिक्त पाणी गोदापात्रात होते.
त्यात भर म्हणून गटारींचे पाणी मिसळत होते. अहल्यादेवी होळकर पुलाच्या पुढेदेखील पुराची स्थिती गंभीर होते.
सध्या शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राबवण्याचे ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढेल, तसेच पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.
त्याचप्रमाणे आनंदवली ते होळकर पुलाखालीदेखील गाळ साचला असून, तो हटविल्यास
साठवण क्षमता वाढण्याबरोबरच ग्राऊंड वॉटर रिचार्ज प्रक्रियेला चालना मिळेल, असे देवांग जानी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय पावसाळी गटार योजनेचे पाणी थेट नदीपात्रात मिसळते आणि त्यामुळे नदीला पूर येतो. हे टाळण्यासाठी पावसाळी गटारींचे पाणी शोषखड्डे करून जमिनीत मुरवले तर भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत
होईल, त्यासाठी गोदाप्रेमी नागरी सेवा समिती आणि मविप्र वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते
विनामोबदला सहकार्य करण्यास तयार असल्याचे जानी यांनी म्हटले आहे.

Web Title: Removal of the mud from the dam will be the risk of the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.