सामनगाव-आडगाव रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:01 AM2018-03-06T01:01:37+5:302018-03-06T01:01:37+5:30
सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यानी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
एकलहरे : सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
जुने सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, एकलहरे, ओढा, शीलापूर, विंचूरगवळी ते आडगाव हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येत आहे. या भागातील रहिवासी, ग्रामस्थ, शेतकरी यांना दररोज शहरात यावे लागते. मात्र या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. कच्च्या रस्त्यामुळे सतत धुळ उडत असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असून रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकलहरे येथील मातोश्री कॉलेजला येणारे विद्यार्थी व पालकांनादेखील मोठा त्रास सहन करावा लागतो. कच्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने डांबरीकरणाचे काम कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे खासदार, आमदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागातील या महत्त्वाच्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.