तीन पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 04:31 PM2019-06-14T16:31:42+5:302019-06-14T16:32:26+5:30
खर्डे :येथे गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत लोकसहभागातून तीन पाझर तलावातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचे काम सुरू आहे . ,लोकसहभागातून जवळपास तीन पाझर तलावातून गाळ उपसा करण्याचे काम सुरू झाले असून ,याकामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे . टाटा ट्रस्ट व युवा मित्र ,सिन्नर आ िणमहाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत येथील लांबी कार ,ब्राह्मण आंबा व धोडी या तीन पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून उपसण्यात आला .
खर्डे (वार्ताहर ) येथे गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत लोकसहभागातून तीन पाझर तलावातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचे काम सुरू आहे . ,लोकसहभागातून जवळपास तीन पाझर तलावातून गाळ उपसा करण्याचे काम सुरू झाले असून ,याकामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे . टाटा ट्रस्ट व युवा मित्र ,सिन्नर आ िणमहाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत येथील लांबी कार ,ब्राह्मण आंबा व धोडी या तीन पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून उपसण्यात आला . या उपक्र माला गावातील शेतकर्यांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे . एकेकाळी पाण्याचे माहेर घर असलेल्या या परिसरात दुष्काळ पडला असून , हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे . मुलूकवाडी येथील विहीर अधिग्रहित करून गावाला चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे .खर्डे परिसराला लाभदायक ठरणारे वार्शी धरणातील पाणी उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच कमी झाल्याने विहिरींनी तळ गाठला . परिणामी परिसरातील शेतकर्यांचे पाण्याअभावी कांदा पीक वाया गेल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे . पाण्याअभावी हा परिसर ओसाड झाला असून , शेतकरी वर्ग मोटाकुटीस आला आहे . भविष्यात उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी येथील शेतकर्यांनी गाळ मुक्त धरण ,गाळ युक्त शिवार योजनेला लोकसहभागातून चांगला प्रतिसाद दाखिवल्याने या तीनही पाझर तलावातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा झाला आहे . जून मिहना अर्धा होत आला तरी अध्याप पाऊस पडत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असून , पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे . समाधान कारक पाऊस झाल्यास या गाळ मुक्त अभियानाचा निश्चितच फायदा होईल . यात शंका नाही .
फोटो ओळ - खर्डे येथे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून धोडी पाझर तलावातून लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसण्याचे सुरू असलेले काम .(14 खर्डे धरण)