युद्धपातळीवर गाळ काढण्याचे काम
By admin | Published: August 6, 2016 12:14 AM2016-08-06T00:14:55+5:302016-08-06T00:18:13+5:30
कसबे सुकेणे : बाणगंगाकाठच्या गावांतील लहान-मोठे पूल, मोऱ्या वाहून गेल्या
कसबे सुकेणे : बाणगंगेला आलेल्या प्रचंड पुरामुळे गेल्या दोन दिवसांपासून गावातील ज्या घरांमध्ये पाणी शिरले होते त्यातील गाळ काढण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे.
पूरपाणी ओसरू लागल्याने गोदावरी व बाणगंगाकाठच्या बहुतांश गावांतील लहानमोठे पूल, मोऱ्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे या भागातील वाहतुक ठप्प आहे. दंनंदिन वापराचे रस्ते वाहून गेल्याने उद्या गावात कसे जायचे, शाळा-महाविद्यालय, नोकरीच्या ठिकाणी कसे जायचे आदि प्रश्न या भागातील नागरिकांपुढे पडले आहेत. प्रशासनाने बाणगंगा आणि गोदाकाठच्या गावातील नुकसानग्रस्त रस्ते आणि पूल यांची युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी चांदोरीचे सरपंच संदीप टर्ले, सिद्धार्थ वनारसे, पुष्कर हिंगणे, सुरेश भोर, अशपाक शेख, लालजी हिरे, उल्हास कदम, छगन जाधव, विलास गडाख, भूषण धनवटे, दिनकर बोडके, हेमंत चौधरी, सुदाम जाधव यांनी केली आहे. (वार्ताहर)