खात्यावरील १० हजार परस्पर काढले

By admin | Published: November 17, 2016 12:19 AM2016-11-17T00:19:48+5:302016-11-17T00:21:38+5:30

तक्र ारीनंतर भरणा : करंजाळीतील महाराष्ट्र बॅँकवादाच्या भोवऱ्यात

Removed 10 thousand interactive accounts | खात्यावरील १० हजार परस्पर काढले

खात्यावरील १० हजार परस्पर काढले

Next

 पेठ : तालुक्यातील करंजाळी येथील महाराष्ट्र बँकेचे ग्राहक नारायण चौधरी यांच्या खात्यातील दहा हजार रूपयांचे गूढ वाढले असून, तक्र ारदार पोलीसात जाताच रक्कम खात्यात जमा झाल्याचा प्रकार झाल्याने बॅक व्यवस्थापनच वादात सापडले आहे .
याबाबतचे वृत्त असे की करंजाळी येथील बॅँक आॅफ महाराष्ट्र शाखेत कार्यक्षेत्रातील उस्थळे (फणस पाडा) येथील नारायण तुकाराम चौधरी याचे खाते (क्र. २५०३५७९९२६२) आहे. त्यांचे खात्यावर दि ३१ मार्च अखेर, २६ हजार ८११ रुपये शिल्लक होती. त्यातून दि. २२ रोजी १० रुपये काढण्यात आले होते.
खात्यावरील उर्वरीत रक्कम काढण्यासाठी चौधरी दि. १३ नोव्हेंबर रोजी बँकेत गेले असता त्यांना तुमच्या खात्यात काहीही रक्कम नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना धक्काच बसला. अत्यंत हवालदिल झालेलया चौधरी यांना बॅँक व्यवस्थापना कडून सहकार्य मिळण्या ऐवजी तुमच्या खात्यातून एटीएम मधून पैसे काढल्याचे सांगण्यात आले.
एटीएम म्हणजे काय ? याची माहिती नसलेले चौधरी रडू लागल्याने बॅँकेत ग्राहक म्हणुन आलेल्या एका ग्राहकाने आपुलकीने सर्व घटना समजून घेऊन त्यास पोलीसांकडे जाण्यास सांगितले.
त्याप्रमाणे नारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे गाठुन हवालदार जाधव यांनी सर्व घटनाक्रम समजून घेऊन चौधरी यांचा तक्रारी अर्ज घेतला. याची खबर बँक व्यवस्थापनास लागताच चौधरींच्या खात्यावर दहा हजार रूपये जमा झाल्याचा प्रकार तपासकामी गेलेल्या हवालदार जाधव व महाले यांच्या निर्दशनास आला.
चौधरी यांचेकडे एटीएम नसतांना ६०७३८५३३३३६३४८ या क्रमांकाच्या कार्डवरूण दि. १८ व २६ आक्टोबर रोजी प्रत्येकी ५ हजार रुपये काढण्यात आल्याचे आढळून आले. (वार्ताहर)

Web Title: Removed 10 thousand interactive accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.