नाशकात मनसेकडून औरंगाबाद रोडचे नामांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:34 AM2021-01-13T04:34:13+5:302021-01-13T04:34:13+5:30
सध्या औरंगाबादचे नामांतर करण्याचा विषय राजकीय पटलावर गाजत आहे. मनसेचे नामकरणाला समर्थन असून त्यामुळेच काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील बसस्थानकात ...
सध्या औरंगाबादचे नामांतर करण्याचा विषय राजकीय पटलावर गाजत आहे. मनसेचे नामकरणाला समर्थन असून त्यामुळेच काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील बसस्थानकात औरंगाबादकडे जाणाऱ्या बसगाड्यांवर संभाजी नगर असे स्टीकर्स लावले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा अशाच प्रकारे आंदोलन करण्यात आले. मुंबई-आग्रा महामार्गावर औरंगाबाद नाक्यावर संभाजी नगर असे दिशादर्शक फलक लावण्यात आले आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबजी करण्यात आली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ साली औरंगाबादचे संभाजी नगर असे नामकरण करण्याची घेाषणा केली होती. त्यानंतर देखील या शहराचे नामकरण झालेले नाही. ते आता त्वरित झाले पाहिजे आणि शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. औरंगाबादकडे जाणाऱ्या मार्गावर संभाजीनगरकडे असा दिशादर्शक फलक लवण्यात आला. शहराध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाप्रमुख मनोज घोडके, संदीप भंवर, सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, सचिन भोसले, संजय देवरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
छायाचित्र आर फोटोवर ०९ एमएनएनएस