शहरापेक्षा ग्रामीण भागातील शिक्षक अधिक प्रयोगशील,शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:17 PM2018-01-31T18:17:43+5:302018-01-31T18:20:08+5:30
ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव असतानाही तेथील शासकीय शाळांमधील शिक्षक मुंबई असो वा नाशिक महापालिका क्षेत्रातील शासकीय शाळांमधील शिक्षकांपेक्षा प्रयोगशील असून, त्यांच्या या प्रयोगशीलतेने शालेय शिक्षणप्रणालीत प्रात्यक्षिक प्रयोगांद्वारे उल्लेखनीय बदल घडवून आणला असल्याचे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
नाशिक : ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव असतानाही तेथील शासकीय शाळांमधील शिक्षक मुंबई असो वा नाशिक महापालिका क्षेत्रातील शासकीय शाळांमधील शिक्षकांपेक्षा प्रयोगशील असून, त्यांच्या या प्रयोगशीलतेने शालेय शिक्षणप्रणालीत प्रात्यक्षिक प्रयोगांद्वारे उल्लेखनीय बदल घडवून आणला असल्याचे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
महिरावणी येथील संदीप फाउंडेशनच्या संदीप इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च सेंटर येथे आयोजित ह्यशिक्षणाची वारीह्ण उपक्रमांतर्गत बुधवारी (दि.31) तिसऱ्या दिवशी ते शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, आमदार नरेंद्र पवार, सीमा हिरे, तंत्रशिक्षण मंडळाचे विभागीय सहसंचालक प्रा. ज्ञानदेव नाठे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे प्राचार्य रवींद्र जावळे, संदीप विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रामचंद्रन, डॉ. प्रशांत पाटील, प्रदीप पेशकार, प्राचार्य प्रशांत पाटील, महिरावणीच्या सरपंच आरती गोराळे आदी उपस्थित होते. शिक्षणमंत्री म्हणाले, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यात उपक्रमशील शिक्षकांचे योगदान उल्लेखनीय आहे. प्रयोगशील शिक्षकांनी शाळांमध्ये दिलेल्या प्रात्यक्षिक शिक्षणामुळे 2014 मध्ये देशात 16 व्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर प्रगती केली असल्याचेही तावडे यांनी यावेळी नमूद केले. त्यांनी थेट शिक्षकांमध्ये फिरून संवाद साधला. यावेळी मराठी-इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांसह उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनीही त्यांच्या शैक्षणिक समस्या शिक्षणमंत्र्यांसमोर मांडताना शैक्षणिक प्रगतीसाठी विविध पर्यायही सुचविले. नाशिक पंचायच समितीचे सभापती रत्नाकर चुंभळे यांनी गुवणत्ता वाढीसाठी ऑप्टिकल फायबरने जोडलेल्या ग्रामपंचायतींमार्फत ही कनेक्टिव्हिटी जिल्हा परिषद शाळांनाही द्यावी, गणित व विज्ञान विषयाच्या मोबाइल शाळा तालुकास्तरावर उपलब्ध करून द्याव्यात तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रकही ऑनलाइन करण्याचा पर्याय सुचवला. प्रास्ताविक महाराष्र्ट् विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी आभार मानले.