प्रिंटीग व्यवसायिकाकडे ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:05 PM2018-11-28T18:05:38+5:302018-11-28T18:06:20+5:30

नाशिक : आर्थिक व्यवहारातून प्रिंटींग व्यवसायिकाच्या दुकानात घुसून त्याच्या पत्नीकडे चार-पाच संशयितांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागून धमकावल्याची घटना मंगळवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास घनकर लेनमध्ये घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित महेंद्र प्रताप दळवी, त्याचे दोन ते तीन साथीदार (पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) व भाग्याबाई (रा. हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

Rendezvous demanding Rs 30 lakh to the printing businessman | प्रिंटीग व्यवसायिकाकडे ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

प्रिंटीग व्यवसायिकाकडे ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

Next
ठळक मुद्दे घनकर लेनमधील प्रकार : दुकानात घुसून शिवीगाळ : सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : आर्थिक व्यवहारातून प्रिंटींग व्यवसायिकाच्या दुकानात घुसून त्याच्या पत्नीकडे चार-पाच संशयितांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागून धमकावल्याची घटना मंगळवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास घनकर लेनमध्ये घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित महेंद्र प्रताप दळवी, त्याचे दोन ते तीन साथीदार (पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) व भाग्याबाई (रा. हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

सरकारवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत अरविंद लभडे (४५, रा. घर नंबर ४०२, घनकर लेन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे घनकर लेनमधील आसरा बिल्डिंगमध्ये दुकान असून तिथे प्रिटिंगचा व्यवसाय चालतो़ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी दुकानात असताना संशयित महेंद्र दळवी व त्याचे साथीदार दुकानात घुसले़ यानंतर पत्नीला शिवीगाळ करून ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून पैसे न दिल्यास गेम करण्याची धमकी देऊन गाळ्याचे शटर लावून कुलूप लावले़

दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी वळवी व त्यांच्या साथीदारांविरोधात खंडणी व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Rendezvous demanding Rs 30 lakh to the printing businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.