१६ पुरातन मंदिरांचे होणार नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2016 11:07 PM2016-01-31T23:07:26+5:302016-01-31T23:09:08+5:30

निधी मंजूर : पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा

Renewal of 16 ancient temples | १६ पुरातन मंदिरांचे होणार नूतनीकरण

१६ पुरातन मंदिरांचे होणार नूतनीकरण

Next

नाशिकरोड : अंजनेरी गावालगत ८०० ते १००० वर्षांपूर्वीच्या पुरातन जैन, वैष्णव व शैव समाजाच्या १६ मंदिरांच्या नूतनीकरणासाठी केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे १६.९५ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. तीन वर्षांच्या काळात मंदिराचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव असून, पूर्वतयारीसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा व डायरेक्टर जनरल तिवारी यांची भेट घेऊन स्पेशल प्रोजेक्ट काही काळाकरिता तयार करून दरवर्षी काही निधीची तरतूद करावी त्यामुळे १६ मंदिरांचे नूतनीकरण होईल, अशी मागणी केली होती.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संचालक जानवी शर्मा यांनी याबाबत औरंगाबाद विभागीय कार्यालयास पुरातन मंदिर नूतनीकरणासाठी लागणारा २०१५-१६ या वर्षाच्या निधीची गरज व उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ३ वर्षांचे उद्दिष्ट ठेवून प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले होते. तसेच येणाऱ्या २०१६-१७ या अर्थसंकल्पात किती निधी लागेल याचे स्पष्टीकरण प्रस्तावात मागितले होते.
पुरातन मंदिर नूतनीकरण कामाच्या पूर्वतयारीसाठी १५ लाख निधीस केंद्रीय पुरातत्त्व विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. आगामी तीन वर्षांत अंजनेरी परिसरातील हेमाडपंती १६ मंदिरांचे नूतनीकरण पूर्ण होईल, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Renewal of 16 ancient temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.