चैत्र पौणिमेनिमित्त रेणुकादेवी यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:45 AM2018-04-01T00:45:14+5:302018-04-01T00:45:39+5:30
येथील श्री रेणुकामातेचा चैत्रोत्सव शनिवारी (दि. ३१) संपन्न झाला. पहाटे ६ वाजता महाअभिषेक, त्यानंतर पालखी मिरवणूक, महाप्रसाद भंडारा आदी कार्यक्रम झाले. श्री रेणुकादेवीस वज्रलेप केल्याने मूर्तीचे आकर्षण वाढले असून, पुरातन स्वरूप दिल्याने मंदिराचा कायापालट झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चांदवड : येथील श्री रेणुकामातेचा चैत्रोत्सव शनिवारी (दि. ३१) संपन्न झाला. पहाटे ६ वाजता महाअभिषेक, त्यानंतर पालखी मिरवणूक, महाप्रसाद भंडारा आदी कार्यक्रम झाले. श्री रेणुकादेवीस वज्रलेप केल्याने मूर्तीचे आकर्षण वाढले असून, पुरातन स्वरूप दिल्याने मंदिराचा कायापालट झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. आज हजारोभाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नाशिकचे नितीन चांदवडकर, मालेगावचे प्रदीप सोनार, मनमाडचे जगन्नाथ सांगळे यांच्या वतीने महाप्रसाद तर चांदवड येथील महावीर जैन सेवा केंद्र व तालुका शिवसेनाप्रमुख शांताराम ठाकरे यांच्या वतीने शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. एकदिवसीय यात्रोत्सव काळात मिठाई, खेळणी, नारळ, प्रसाद यांची दुकाने थाटली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अनेक भाविक येथे दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी आले होते. भाविक प्रत्येक पायरीवर नारळ फोडण्याचा नवस करतात व त्यासाठी नारळ फोडण्याचे मशीनदेखील आहे. रेणुकादेवी संस्थानने अनेक सुधारणा केल्या असून, त्यात सध्या देवीचा गाभारा उंच व देवी सर्वांना दिसावी असा पद्धतीने कामे झाली आहेत तर पुरातत्व विभागाचे वतीने मंदिर परिसरात बऱ्याच सुधारणा सुरू आहेत. पुरातन काळातील असलेली दीपमाळ त्याच धर्तीवर नव्याने बनविली आहे. यात्रास्थळ विकास निधीतून भक्तनिवास, हॉल, स्त्रियांसाठी प्रसाधनगृह, वृद्ध व अपंग भाविकांसाठी विश्रामगृह नवरात्रात व गर्दीचे वेळेस भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून शिर्डीच्या धरतीवर स्टीलचे बॅरिकेटिंग बसविण्यात आले.