रेणुका माता यात्रेत कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 04:19 PM2018-11-26T16:19:01+5:302018-11-26T16:20:08+5:30
येवला : येथील ग्रामदैवत असलेल्या रेणुका मातेचा तीन दिवसीय यात्रा उत्सव नुकताच पार पडला आहे. त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा सुरू झाली होती. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म राबवण्यात आले होते.
येवला :
येथील ग्रामदैवत असलेल्या रेणुका मातेचा तीन दिवसीय यात्रा उत्सव नुकताच पार पडला आहे. त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा सुरू झाली होती. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म राबवण्यात आले होते. रेणुका देवी मंदिर परिसराला विद्युत रोषणाईने सजविले होते. मशाल ज्योतीची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. या परिसरात ही देवी नवसाला पावणारी जगदंबा माता असे ओळखले जाते.म्हणुन भाविकांनी दर्शनासाठी उच्चांक गाठला होता.यात्रेच्या दोन दिवस भाविकांनी यात्रेच्या पिहल्या दिवशी गावातील तरु णांनी सप्तशृंगी गडावर जाऊन पायी मशाल पेटवून येथील रेणुका माता मंदिरात आणली होती. या मशाल ज्योतने यात्रेस प्रारंभ झाला होता.तसेच तिसऱ्या दिवशी कुस्ती दंगली ने यात्रेची सांगता झाली. देवीच्या तकतरावाची मिरवणूक ढोल ताशा व हलगी ढोलकीच्या तालावर गावातून काढण्यात आली होती. देवीभक्तांनी नवस पूर्ण करण्यासाठी पायघड्या टाकून लोटांगण घेत देवीला वंदन केले. देवी मंदिरात व मंदिरासमोरील भव्य दीपमाळेवर ती मशाल रात्रभर पेटवली होती. तसेच यात्रेत लोक मनोरंजनासाठी भिका भीमा सांगवीकर व विजयकुमार गायकवाड संगमनेरकर या दोन तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शेवटी नामांकित पहिलवानांच्या कुस्त्या उत्साहात पार पडल्या. शिंगवे( दत्ताचे) येथील पहिलवांनाने अकराशे एक रु पयाची कुस्ती जिंकुन अंतिम लढतीचे मानकरी ठरले.