रेणुकामाता यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:49 PM2019-12-27T23:49:05+5:302019-12-27T23:49:30+5:30
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्यदैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सवास शुक्रवारी (दि.२७) उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडणार आहेत.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्यदैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सवास शुक्रवारी (दि.२७) उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडणार आहेत.
पौष शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी यात्रेस प्रारंभ झाला आहे. यात्रोत्सव समितीच्या वतीने मंदिर परिसरात सुशोभिकरण आणि मंदिर संकुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रामुख्याने मंदिर संकुलात असणाºया रेणुकामाता मंदिरासह विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्त महाराज, साईनाथ महाराज, श्रीराम, खंडेराव महाराज यांच्या गाभाºयात आकर्षक गुलाबपुष्पांनी सजावट केली आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजता मंदिराच्या पटांगणात कनात उभारण्यात आली. सकाळी देवीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीस हिरवे पातळ, हिरव्या बांगड्यांचा चुडा, अलंकार व नथ चढविण्यात आली. यावेळी रेणुकामातेची विधिवत पूजा करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. सकाळपासूनच परिसरातील भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. सायंकाळी गावातून सजविलेल्या आकर्षक रथातून देवीच्या मुखवट्याची व काठीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
रात्री करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा झाला. यात्रेच्या दुसºया दिवशी म्हणजे शनिवारी (दि.२८) मंदिरासमोर हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. यादिवशी दर्शनासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गावातील व पंचक्रोशीतील महिला नवस फेडण्यासाठी लोटांगण, गळ खेळणे, प्रसाद वाटप करतात. दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार असून, यावेळी सुमारे तीन हजार रुपयांपर्यंत इनाम दिले जाणार आहे. याप्रसंगी नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.
मिरवणुकीत यात्रा समितीचे पदाधिकारी, गावातील आबालवृद्धांसह तरु ण मित्रमंडळ व महिला वर्ग सहभागी झाले होते. गावात ठिकठिकाणी रथाचे व मुखवट्याचे पूजन करण्यात आले.
४मिरवणुकीच्या शेवटी पुन्हा महाआरती करु न देवीचा मुखवटा दर्शनासाठी मंदिरात ठेवण्यात आला. गावातील महिलांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. रात्री मंदिर परिसरात फटाक्यांची आतषबाजी व शोभेची दारु उडविण्यात आली.