ठक्कर डोम येथील कोविड सेंटर पुन्हा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:14 AM2021-03-27T04:14:34+5:302021-03-27T04:14:34+5:30
गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जगभरात थैमान घातले असून, नाशिक शहरात पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढले आहे. याचा गंभीर ...
गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जगभरात थैमान घातले असून, नाशिक शहरात पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढले आहे. याचा गंभीर फटका शहरातील सामान्य नागरिकांना बसत आहे. शहरात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स अनेक आहेत; पण त्यांचे अवाजवी दर सर्वसामान्य रुग्णाला परवडणारे नाही. अशा परिस्थितीत नाशिक प्रशासनातर्फे गेल्या वर्षी ठक्कर डोम येथे कोविड सेंटर उभारले होते. परंतु काही दिवसांपूर्वी परिस्थिती पूर्ववत येत असताना ते सेंटर बंद झाले. परंतु सद्य:स्थिती बघता हे सेंटर पुन्हा सुरू करण्याची निकड जाणवते आहेे. शासनाने पुन्हा हे सेंटर सुरू करावे जेणेकरून गरीब आणि सामान्य रुग्णांना आर्थिक झळ बसणार नाही, असे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष अंकुश वराडे, मुकेश शेवाळे, जितू जाधव, भास्कर साळुंके, यतीन पाटोळे यांनी दिले आहे.
(फोटो २६ एनसीपी) -
ठक्कर डोम येथील कोविड सेंटर पुन्हा सुरू करावे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देताना अंकुश वराडे, मुकेश शेवाळे, जितू जाधव, भास्कर साळुंके, यतीन पाटोळे आदी.