महामार्गाचे सर्व्हिस रोड तत्काळ दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:19+5:302021-09-16T04:19:19+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील उंबरखेड चौफुली, चिंचखेड चौफुली आणि वणी चौफुली जवळील सर्व्हिस रोड पूर्णपणे खराब झाला असून अत्यंत ...

Repair highway service roads immediately | महामार्गाचे सर्व्हिस रोड तत्काळ दुरुस्त करा

महामार्गाचे सर्व्हिस रोड तत्काळ दुरुस्त करा

Next

पिंपळगाव बसवंत : परिसरातील उंबरखेड चौफुली, चिंचखेड चौफुली आणि वणी चौफुली जवळील सर्व्हिस रोड पूर्णपणे खराब झाला असून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दररोज लहान मोठे अपघात घडत असल्याने तातडीने महामार्गाचे सर्व्हिस रोड दुरुस्त करा, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने प्रोजेक्ट डिरेक्टर तथा नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया, नाशिक यांना देण्यात आले आहे. रस्ता दुरवस्थेमुळे वाहनधारकांना व शेतकऱ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत. संबंधित प्रशासनाला दुरुस्तीबाबत वारंवार नागरिकांना लेखी व तोंडी सांगूनदेखील प्रशासन सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीबाबत निर्णय घेत नाही. त्यामुळे आता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव शहरातील शिवसेना आक्रमक झाली असून महामार्गाचे सर्व्हिस रोड तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. यावेळी किरण लभडे, नितीन बनकर,सागर झोमण, रुपेश शिंदे, नंदकुमार कुऱ्हाडे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते. (१५ पिंपळगाव रोड)

---------------------------

सर्व्हिस रोडच्या दयनीय अवस्था मुळे शेतकरी, वाहनधारक आणि पिंपळगावकर नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात महामार्गाच्या सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीसाठी संबंधित प्रशासनाने पावले उचलली नाही तर शिवसेना स्टाईलने सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीचे नियोजन केले जाईल.

नीलेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, नाशिक ग्रामीण

150921\15nsk_9_15092021_13.jpg

१५ पिंपळगाव रोड

Web Title: Repair highway service roads immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.