पिंगळवाडेत मानधनमधून शिवमंदिराची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:25 AM2020-11-13T00:25:44+5:302020-11-13T00:26:22+5:30
सटाणा : तालुक्यातील पिंगळवाडे येथील सरपंच लताबाई केदा भामरे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आर्थिक वर्षाच्या मानधनातून गावातील पुरातन काळातील वसलेले शिवमंदिराचे डागडुजी काम, दिव्यांग बंधूंना व ग्रामपंचायत, सोसायटी, तलाठी कार्यालयातील कर्मचारी यांना दिवाळी भेट म्हणून नवीन कपडे, अल्पोपहार दिला.
सटाणा : तालुक्यातील पिंगळवाडे येथील सरपंच लताबाई केदा भामरे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आर्थिक वर्षाच्या मानधनातून गावातील पुरातन काळातील वसलेले शिवमंदिराचे डागडुजी काम, दिव्यांग बंधूंना व ग्रामपंचायत, सोसायटी, तलाठी कार्यालयातील कर्मचारी यांना दिवाळी भेट म्हणून नवीन कपडे, अल्पोपहार दिला. या कार्यक्रमप्रसंगी ग्रामसेवक सुनील ठोके, तलाठी मनोज भामरे, उपसरपंच संजय भामरे, सदस्य मंगल भामरे, कौतिक भामरे, अरुण बागुल, गंगाधर भांगरे, पप्पू शिंगारे, रवींद्र भामरे, केदा भामरे, दौलत पाटील, बाजीराव भामरे, शिवाजी बागुल, सदाशिव कोठावदे, दगडू अहिरे, लक्ष्मण भामरे, मुरलीधर भामरे, नितीन भामरे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य अरुण बागुल यांनी केले.
गावातील शिवमंदिर पुरातन झाल्याने माझ्या मिळणाऱ्या मानधनातून डागडुजी व दिव्यांगांना मदत व गावातील सर्व कार्यालयातील गरजू कर्मचारी यांना दिवाळी भेट म्हणून अल्पोपहर दिल्याने समाधान वाटले.
- लताबाई भामरे, सरपंच, पिंगळवाडे