सटाणा, मनमाड येथे रिपाइंतर्फे मोर्चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:48 AM2018-08-14T01:48:19+5:302018-08-14T01:48:38+5:30
संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ व सनातनी आरोपींना शासनाने त्वरित पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) बागलाण तालुक्याच्या वतीने तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आले.
सटाणा : संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ व सनातनी आरोपींना शासनाने त्वरित पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) बागलाण तालुक्याच्या वतीने तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आले. दिल्ली येथे दि.९ रोजी काही सनातन विद्रोही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध केलेली घोषणाबाजी मानव जातीला काळिमा फासणारी आहे. या घटना शासनाच्या हलगर्जीपणामुळे घडत असून हे प्रकार असेच चालू राहिले तर पक्षाच्यावतीने आंदोलनाचे पाऊल उचलण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी पक्षाचे सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुकाध्यक्ष बापुराज खरे, जिभाऊ अहिरे, देवा गांगुर्डे, बापू पवार, दादा खैरनार, विनायक खरे, राजू भामरे, जगदीश भामरे, यशवंत अहिरे, यशवंत भामरे, सुरेश पवार, राहुल खरे, रमेश व्यापार, सुरेश पवार, भाऊसाहेब उशीर, रमेश वाघ, प्रदीप सोनवणे, अशोक खरे, दत्तू खरे, सुनील भामरे, अप्पा बोराळे व कार्यकर्ते उपस्थित होते. मनमाड : दिल्ली येथे संविधान जाळून प्रक्षोभक भाषण करण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मनमाड शहरात उमटले. मनमाड शहर रिपाइंच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. संविधानाची प्रत जळणाऱ्या श्रीनिवास पांडे याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला भर चौकात फाशी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र अहिरे, कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली येथील रिपाइं भवनपासून मोर्चाला प्रारंभ झाला. महात्मा गांधी पुतळा, शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे निषेधाच्या घोषणा देत निघालेला मोर्चा एकात्मता चौकात पोहोचला. येथे पांडे याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला भर चौकात फाशी देऊन मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. विविध पक्ष व संघटना पदाधिकाºयांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी तालुकाध्यक्ष कैलास अ हिरे, शहराध्यक्ष दिलीप नरवडे, पी. आर. निळे, दिनकर धिवर, सुरेश शिंदे, रु पेश अहिरे, गुरु कुमार निकाळे, मोझेस साळवे, महेंद्र वाघ, पुष्पलता मोरे, अरु णा जाधव, मंगल सोनवणे, बबनबाई वाघ, यशवंत बागुल,योगेश बोदडे, लक्ष्मण धिवर, राजेंद्र ढेंगे, रवींद्र घोडेस्वार, फिरोज शेख, अहमद बेग, वाल्मीक आंधळे, सुनील साळवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
लाल सेनेच्या वतीने निषेध
मनमाड : दिल्ली येथे संविधान प्रत जाळल्याच्या निषेधार्थ मनमाड येथे लाल सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.. संविधान प्रत जळण्याचे हीन कृत्य करणार्या समाज कंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे उ महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, सरचिटणीस संदीप कांबळे, तालुकाध्यक्ष प्रकाश खैरनार, प्रकाश खंडांगळे, राजू नविगरे, कैलास नविगरे, अक्षय पगारे, नाना धगटे, रवी खैरनार, आनंद पगारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.