राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:33+5:302021-08-25T04:20:33+5:30

मनमाड : येथील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, आमदार गोपीचंद पडळकर ...

Repercussions of Rane's controversial statement | राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद

राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद

Next

मनमाड : येथील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शहरासाठीच्या करंजवन पाणीपुरवठा योजनेच्या ठरावासह

१३ ठराव मंगळवारी मंजूर करण्यात आले. कोविडचे कारण पुढे करून पालिकेची सभा ऑनलाइन घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कॉंग्रेसचे नगरसेवक नाजीम शेख यांनी त्याला कडाडून विरोध केला असता इतर नगरसेवकांनीदेखील त्यांना साथ देऊन सभा ऑफलाईन घेण्याची मागणी केली होती. नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली सभेचे कामकाज सुरू होताच नगरसेवक प्रमोद पाचोरकर यांनी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्येचा मुद्दा उपस्थित केला तर रवींद्र घोडेस्वार, छोटू पाटील, नाजीम शेख यांनी आमदार गोपीचंद पडळकर व राज्यमंत्री रावसाहेब दानवेदेखील वारंवार विवादास्पद वक्तव्ये करतात. या तिघांचा निषेध करून तसा ठराव मांडला. त्याला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी पाठिंबा देऊन ठराव एकमताने मंजूर केला.

करंजवनचा विषय चर्चेसाठी आल्यानंतर मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनी योजनेबाबत शासनाला नवीन ठराव पाठविण्यासोबत योजनेची संपूर्ण माहिती सभागृहाला दिली. शिवाजी नगर भागात असलेली दगडी पाण्याची टाकी पाडून तेथे मुख्याधिकारी यांच्यासाठी नवीन बंगला बांधण्याच्या ठरावाला नाजीम शेख आणि घोडेस्वार यांनी विरोध केला. मुख्याधिकारी सोबत नगराध्यक्ष यांच्यासाठी तेथे निवास बांधण्याची मागणी केली. शहरातील खड्डे, आरोग्य, बंद पडलेले बोअरवेल आदी मुद्दे लियाकत शेख, छोटू पाटील, गणेश धात्रक यांनी उपस्थित केले. सर्वांसाठी घरे या योजनेबाबत नाजीम शेख यांनी आक्रमक भूमिका घेऊन विविध प्रश्न उपस्थित केले. सभेला माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक, गंगाभाऊ त्रिभुवन, विनय आहेर, कैलास गवळी, बब्बू कुरेशी, संतोष आहिरे, मयूर बोरसे, पिंटू सिरसाट आदी उपस्थित होते.

फोटो: १) सर्वासाठी घरे या योजनेबाबत आक्रमक भूमिका घेताना नगरसेवक नाजीम शेख. (२४ मनमाड१)

२) मनमाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे. (२४ मनमाड २)

240821\24nsk_59_24082021_13.jpg

२४ मनमाड १/२

Web Title: Repercussions of Rane's controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.