एटीएम कार्ड बदलून ६५ हजारांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:41 PM2019-10-11T23:41:02+5:302019-10-12T00:33:26+5:30

इगतपुरी येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या मुलाला मशीन खराब आहे असे सांगत चोरट्याने एटीएमची अदलाबदल करून एटीएम व अकाउंटमधील ६५ हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Replacement of ATM card with a bucket of Rs | एटीएम कार्ड बदलून ६५ हजारांचा डल्ला

एटीएम कार्ड बदलून ६५ हजारांचा डल्ला

Next

इगतपुरी : येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या मुलाला मशीन खराब आहे असे सांगत चोरट्याने एटीएमची अदलाबदल करून एटीएम व अकाउंटमधील ६५ हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सत्येंद्र होतीलाल राम (४०, रा. सहा बंगला, रेल्वे क्वार्टर) यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेल्वे विभागात स्टेशनमास्तर असलेले सत्येंद्र राम यांनी पैसे काढण्यासाठी त्यांचा मुलगा अभिनवकुमार यास एटीएममध्ये पाठविले होते. अभिनव एटीएममध्ये गेला असता तेथे एक अज्ञात इसम उभा होता. त्याने एटीएम खराब आहे असे सांगून त्यास तीन चार वेळेस एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकण्यास सांगत पासवर्ड पाहून घेतला. यानंतर त्यास पाच हजार
रु पये काढल्यावर पैसे नीट मोजून घे असे सांगत एटीएम कार्डची अदलाबदल केली. अभिनव निघून गेल्यानंतर चोरट्याने एटीएममधून ट्रान्सफरच्या साहाय्याने ६५ हजार
रु पये काढून घेतले. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Web Title: Replacement of ATM card with a bucket of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.