शिक्षकांची कमतरता असूनही बदलीप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:42 PM2018-11-06T23:42:35+5:302018-11-06T23:44:45+5:30

नाशिक : जिल्हाभरात जवळपास १० टक्के म्हणजेच १ हजार १४७ पदे रिक्त असून, नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया सुरू केली आहे. आत्तापर्यंत आंतरजिल्हा बदलीप्रक्रि येतून नाशिक जिल्ह्यात बदली करून येणाऱ्या शिक्षकांपैकी तब्बल ११२ शिक्षक अजूनही रुजू झालेले नसताना प्रशासनाने पुन्हा एकदा आॅनलाइन बदलीप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या संख्येत आणखी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Replacement process despite lack of teachers | शिक्षकांची कमतरता असूनही बदलीप्रक्रिया

शिक्षकांची कमतरता असूनही बदलीप्रक्रिया

Next
ठळक मुद्दे जिल्ह्णातील पात्र शिक्षकांनी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक : जिल्हाभरात जवळपास १० टक्के म्हणजेच १ हजार १४७ पदे रिक्त असून, नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया सुरू केली आहे. आत्तापर्यंत आंतरजिल्हा बदलीप्रक्रि येतून नाशिक जिल्ह्यात बदली करून येणाऱ्या शिक्षकांपैकी तब्बल ११२ शिक्षक अजूनही रुजू झालेले नसताना प्रशासनाने पुन्हा एकदा आॅनलाइन बदलीप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या संख्येत आणखी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१५ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन संगणकीयप्रणालीद्वारे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या बदलीप्रक्रियेनुसार रायगडमधून ५२ व पालघरमधून ६० शिक्षक रुजू झालेले नाहीत. १० टक्के पदे रिक्त असलेल्या जिल्ह्णांना या बदलीप्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. असे असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्णातील पात्र शिक्षकांनी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Replacement process despite lack of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.