पारंपरिक रांगोळी कलेला नव्याने उजाळा : विसपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:16 AM2019-04-28T00:16:53+5:302019-04-28T00:17:11+5:30

रांगोळी ही पारंपरिक कला ! प्राचीन कलेला आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रमदेखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटांची भव्य गुढी रांगोळी साकारून विक्रम केला आहे.

 Replenish traditional rowlies: Vishpute | पारंपरिक रांगोळी कलेला नव्याने उजाळा : विसपुते

पारंपरिक रांगोळी कलेला नव्याने उजाळा : विसपुते

Next

नाशिक : रांगोळी ही पारंपरिक कला ! प्राचीन कलेला आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रमदेखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटांची भव्य गुढी रांगोळी साकारून विक्रम केला आहे. त्याची ‘वंडरबुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली असून विसपुते यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल विसपुते यांच्याशी केलेली ही बातचीत.
रांगोळीसारख्या कलेतून विक्रम
साकारण्याची कल्पना कशी आली?
मला शालेय जीवनापासूनच चित्रकला आणि रांगोळीची आवड आहे. चित्रकलेत मी जीडी आर्ट नाशिकच्या कलानिकेतनमध्ये करीत आहेत. चित्रकलेचे ज्ञान आहेच, परंतु रांगोळी माझी मीच शिकले. त्याच्या संयोगातूच रांगोळी रेखाटण्याचे काम काही वर्षांपासून करते आहे. रांगोळी ही प्राचीन कला असून तिचे पुनरुज्जीवन करण्याचे मी ठरवले आणि त्यामुळेच रांगोळीतूनच विक्रम करण्याचे ठरविले.
गुढीची रांगोळी ही कल्पना कशी
सुचली? काय परिश्रम घेतले?
रांगोळी ही प्राचीन परंपरा आहे. तसेच गुढीपाढवा हा हिंदूंचा सण आहे. त्यामुळे यानिमित्ताने भव्य गुढीच साकारण्याचे मी ठरविले. ७५ फूट गुढी साकारणे सोपे नव्हते. ती साकारण्याचे ठरविल्यानंतर मी दररोज दोन तास रांगोळी काढण्याचा सराव केला. रांगोळी काढताना सतत वाकून रहावे लागणार असल्याने पाठ दुखणे किंवा हात दुखणे होणारच होते. त्यामुळे विशेष दक्षता म्हणून योगासनेही केली. माझी बहीण वसुधा जानोरकर हीने योगासने शिकवली. त्यानंतर हा विक्रम करण्याचे ठरवले.
तुमच्या भव्य रांगोळीची विक्रमात
नोंद झाली, त्याबद्दल काय भावना?
रांगोळीसारख्या प्राचीन कलेच्या आधारे काही करू शकले याचा आनंद आहेच. परंतु हा विक्रम करण्यासाठी सर्वाधिक प्रोत्साहन माझ्या कुटुंबीयांनी दिले. त्यांच्या पाठबळाशिवाय हे शक्यच नव्हते. याशिवाय वृंदाताई लव्हाटे यांनी हॉलसाठी जे सहकार्य केले, त्यामुळेच हा विक्रम करू शकले. आता आणखी मोठा विक्रम करण्याची गिनीज बुकसह अन्य विक्रमांत नोंद करण्याची इच्छा आहे.
भव्य रांगोळीची
विक्रमात नोंद झाली, त्याबद्दल काय भावना?
रांगोळीसारख्या प्राचीन कलेच्या आधारे काही करू शकले याचा आनंद आहेच. परंतु हा विक्रम करण्यासाठी सर्वाधिक प्रोत्साहन माझ्या कुटुंबीयांनी दिले. त्यांच्या पाठबळाशिवाय हे शक्यच नव्हते. याशिवाय वृंदाताई लव्हाटे यांनी हॉलसाठी जे सहकार्य केले, त्यामुळेच हा विक्रम करू शकले. आता आणखी मोठा विक्रम करण्याची गिनीज बुकसह अन्य विक्रमांत नोंद करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर रांगोळीचा प्रचार- प्रसारदेखील करणार आहे. पूर्वी घराबाहेर रांगोळी काढली जात असे. आता मात्र महिला नोकरदार झाल्या तसेच अन्य कारणांमुळे ही कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे रांगोळीचा प्रसारदेखील नजीकच्या काळात करणार आहे.

Web Title:  Replenish traditional rowlies: Vishpute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.