कळवण : सभापती, उपसभापतीपद राष्ट्रवादीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 04:09 PM2019-12-31T16:09:27+5:302019-12-31T16:10:15+5:30
कळवण-: येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवाणे पंचायत समतिी गणाच्या सदस्य मीनाक्षी शिवाजी चौरे तर उपसभापतीपदी कनाशी पंचायत समिती गणाचे सदस्य विजय दत्तात्रेय शिरसाठ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात झाली.
कळवण-: येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवाणे पंचायत समतिी गणाच्या सदस्य मीनाक्षी शिवाजी चौरे तर उपसभापतीपदी कनाशी पंचायत समिती गणाचे सदस्य विजय दत्तात्रेय शिरसाठ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात झाली. पाटविहीर गावाला सभापती तर कनाशी गावाला उपसभापतीपदाची या निमित्ताने दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता आहे.
सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला निघाल्याने या पदासाठी मीनाक्षी चौरे व मनीषा पवार ही दोन चर्चेत होती. आशा पवार यांना यापूर्वी सभापतीपदावर संधी मिळाली आहे.बाजार समिती सभागृहात आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, रविंद्र देवरे, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कळवण शिक्षण संस्थेचे संचालक भूषण पगार, हेमंत पाटील यांची पंचायत समतिी सदस्यासमवेत बैठक होऊन सभापतीपदासाठी मीनाक्षी चौरे व उपसभापतीपदासाठी विजय शिरसाठ यांना संधी देण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर निवडणुकीचा शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आला .
राष्ट्रवादी काँग्रेस व कॉग्रेसच्या सदस्यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी करु न आघाडीचा धर्म पाळला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार बी ए कापसे व सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी डी एम बहीरम यांनी काम पाहिले. सभापती व उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीनाक्षी चौरे व विजय शिरसाठ यांनी निर्धारित वेळेत एकमेव चार अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी ए कापसे यांनी सभागृहात केली.
निवडीप्रसंगी सभागृहात जिल्हा परिषदेचे गटनेते यशवंत गवळी, माजी सभापती रविंद्र देवरे, बाजार समतिीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कळवण शिक्षण संस्थेचे संचालक भूषण पगार, हेमंत पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, जेष्ठ नेते पोपटराव बिहरम, लालाजी जाधव, सौ पल्लवी देवरे सौ आशाताई पवार,जगन्नाथ साबळेद्ब, सौ मनिषा पवार, अतुल देवरे ,सुनील देवरे, शिवाजी चौरे, विलास रौदळ, उत्तम जगताप , रामा पाटील, शांताराम चौरे, बाळासाहेब गांगुर्डे आदींसह तालुक्यातील बहुसंख्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.