आधी कोरोना अहवाल द्या मगच प्रवेश करा; कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर कांदा उत्पादकांच्या २ किमी रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 11:01 AM2021-05-24T11:01:16+5:302021-05-24T11:01:42+5:30

प्रवेशद्वारावर वाहनाची नोंद नंबर नसलेल्या वाहनांना आत घेण्यात आले नाही.आज सकाळी पाचशे वाहनातील कांदा लिलाव होणार आहे.

Report Corona first then enter; 2 km queue of onion growers outside the APMC Market Nashik | आधी कोरोना अहवाल द्या मगच प्रवेश करा; कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर कांदा उत्पादकांच्या २ किमी रांगा

आधी कोरोना अहवाल द्या मगच प्रवेश करा; कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर कांदा उत्पादकांच्या २ किमी रांगा

googlenewsNext

लासलगाव (नाशिक)- येथील बाजार समितीत आज केवळ पाचशे कांदा घेऊन येणारे वाहनांनाच प्रवेश देत येत असल्याने प्रवेशद्वाराबाहेर सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर्सच्या रांगा लागल्या आहेत. कोरोना अहवाल पाहुनच आतामध्ये केवळ नोंदणी केलेल्या वाहनाना प्रवेश दिला जात होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तबबल 12 दिवसांनंतर बाजार समिती सुरू झाली.

प्रवेशद्वारावर वाहनाची नोंद नंबर नसलेल्या वाहनांना आत घेण्यात आले नाही.आज सकाळी पाचशे वाहनातील कांदा लिलाव होणार आहे.
तब्बल बारा दिवसानंतर  आज लिलाव सुरू होताच किमान सातशे तर जास्तीत जास्त 1481 रूपये व सरासरी 1300रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर होत होता. लासलगाव बाजार समितीचे  सचिव नरेंद्र वाढवणे यांचेसह कर्मचारी पहाट पाच वाजेपासुनच तपासणीनंतरच वाहने तापमानाची चाचणी कररूनच सोडतांना दिसुन आले.

निर्बंधांचे काळात थेट व्यापारी वर्गाचे कांदा खळ्यावर कांदा विक्री करण्यासाठी आवाहन बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी केले होते.परंतु कांदा व्यापारी कांदा पिकाला योग्य भाव देणार नाही म्हणुन बारच अल्प प्रतिसाद मिळाला आहे. वाहनांची गर्दी झाल्याने कोटमगाव रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती.परंतु  पोलिसांनी हस्तक्षेप करीत पिंपळगाव बसवंत कडे जाणारे वाहनांना रस्ता खुला करून दिला आहे.

Web Title: Report Corona first then enter; 2 km queue of onion growers outside the APMC Market Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.