राष्टय आरोग्य मिशनच्या भरतीत गोंधळाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 07:44 PM2020-02-28T19:44:17+5:302020-02-28T19:46:06+5:30

आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग, आरोग्य सेवक, तंत्रज्ञ, लेखाधिकारी, समन्वयक, कौन्सिलर अशा सुमारे साडेतीनशे पदांसाठी

Report of disturbance in recruitment of National Health Mission | राष्टय आरोग्य मिशनच्या भरतीत गोंधळाची तक्रार

राष्टय आरोग्य मिशनच्या भरतीत गोंधळाची तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देयादीतून वगळल्याचा आरोप : पूर्वीच्याच कर्मचाऱ्यांची निवडगुणदान करताना मोठ्या प्रमाणात भेदभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्टÑीय आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाºया विविध पदांच्या भरतीची अंतिम निवड वादात सापडली असून, पात्र उमेदवारांची यादी जाहीर होताच, डावलल्या गेलेल्या उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. कमी गुणांकन असतानाही काही उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले तर आरोग्य मिशनमध्ये सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचीच पुन्हा निवड करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.


आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग, आरोग्य सेवक, तंत्रज्ञ, लेखाधिकारी, समन्वयक, कौन्सिलर अशा सुमारे साडेतीनशे पदांसाठी आॅगस्ट २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्रत्यक्षात सहा महिन्यांनंतर ५ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाने या पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत पात्र ठरू पाहणा-या उमेदवारांची त्यांच्या गुणानुक्रमानुसार त्याचबरोबर आरक्षणानुसार गुणांकन करण्यात आले होते. या भरतीसाठी एका पदासाठी दहापेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यामुळे अगोदर एका पदासाठी पाच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्याचे ठरले व त्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी पुन्हा दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या भरतीसाठी तोंडी मुलाखतीला गुण देण्यात येणार नाही असे जाहीर करण्यात आले, त्याचबरोबर कामाचा पूर्वीचा अनुभव असण्याबाबतही अगोदर फारसा उलगडा करण्यात आलेला नसतानाही कागदपत्र तपासणीत उमेदवारांना अनुभवाचे गुण देण्यात आले. मात्र असे गुणदान करताना मोठ्या प्रमाणात भेदभाव करण्यात आला. अनेक उमेदवारांनी खासगी वैद्यकीय रुग्णालयाचे अनुभव प्रमाणपत्र सादर केले असल्याने त्यांना देण्यात आलेले गुण व शासकीय रुग्णालयात काम केलेल्या उमेदवारांच्या गुणदानात मोठी तफावत करण्यात आल्याची तक्रार उमेदवारांनी केली.

Web Title: Report of disturbance in recruitment of National Health Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.