‘त्या’ रुग्णांच्या कुटुंबातील चौघांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:00 AM2020-04-26T00:00:56+5:302020-04-26T00:01:18+5:30

ग्रामीण भागातील एकाच कुटुंबातील दोघांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी असून, त्या रुग्णांच्या कुटुंबातील अन्य चार व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

The report of four members of the family of 'those' patients was negative | ‘त्या’ रुग्णांच्या कुटुंबातील चौघांचा अहवाल निगेटिव्ह

‘त्या’ रुग्णांच्या कुटुंबातील चौघांचा अहवाल निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देसिन्नर तालुका । सर्व जण वैद्यकीय निरीक्षणाखाली

सिन्नर : तालुक्यातील ग्रामीण भागातील एकाच कुटुंबातील दोघांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी असून, त्या रुग्णांच्या कुटुंबातील अन्य चार व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मालेगाव प्रवासाचा इतिहास असलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीपाठोपाठ त्याच्या मुलाचा कोरोना तपासणी अहवालदेखील पॉझिटिव्ह आला होता. पहिल्या रुग्णाचा अहवाल आल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून या कुटुंबाच्या संपर्कातील १३ जणांना व एका वैद्यकीय अधिकाऱ्याला तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. तर रुग्णांच्या कुटुंबातील अन्य चार पैकी दोघांचे अहवाल सकारात्मक असून अन्य दोघांचे अहवालदेखील निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.
मालेगाव येथून परतल्यावर गेल्या ११ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह अहवाल आलेले दोन्ही रुग्ण व त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा त्यानंतर कोणाशीही संपर्क आलेला नाही. तर गावात असताना त्यांच्याशी जवळून आलेल्या व्यक्तींचे अहवालदेखील निगेटिव्ह आले असून ते सर्वजण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
प्रत्येकाने काळजी घ्यावी व सर्वेसाठी येणाºया कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. बच्छाव यांनी केले आहे.

Web Title: The report of four members of the family of 'those' patients was negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.