वारसांची फसवणूक झाल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 06:37 PM2018-12-20T18:37:06+5:302018-12-20T18:37:21+5:30

तळेगाव येथील आदिवासी जमिनीची परस्पर विक्र ी करून वारसांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जय किसान आदिवासी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

Report that the heirs of the deceased have been deceived | वारसांची फसवणूक झाल्याची तक्रार

वारसांची फसवणूक झाल्याची तक्रार

Next
ठळक मुद्देआदिवासी भागातील घटना : जय किसान आदिवासी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

घोटी : तालुक्यातील तळेगाव येथील आदिवासी जमिनीची परस्पर विक्र ी करून वारसांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जय किसान आदिवासी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव येथील आदिवासी जमीन कमल दगडू जाधव तथा कमल दत्तू भवारी यांच्या वडिलोपार्जित मालकीची आहे. या जमिनीतील प्लॉटवर जाधव मयत झाल्यानंतर त्यांची पत्नी भोराबाई लहानू जाधव यांचे नाव सातबारा उताºयावर दाखल आहे. भोराबाई जाधव मयत झाल्यानंतर त्यांना वारस नसल्याने सख्खे पुतणे व पुतणी असे दोघे पांडुरंग नामदेव ऊर्फदगडू जाधव व पुतणी कमल दत्तू भवारी हे दोघे वारस आहेत; परंतु या मिळकतीवर कमल हिला डावलून पांडुरंग जाधव यांचे नाव दाखल करण्यात आले. कमल वारस असूनही तिचे नाव दाखल नसल्याने संबंधितांनी ही आदिवासी जमीन विक्र ांत विश्वास सावकार, शैलेश अर्जुन बोंदार्डे, नंदा पांडुरंग जाधव व पुष्पा पांडुरंग जाधव यांना परस्पर विक्र ी केली. कमलचा हिस्सा असल्याने ती अडचण करील म्हणून संबंधितांनी कमलला अर्धा मोबदला देण्याचे सांगितले; मात्र मोबदला न देता फसवणूक करत साठेखतावर साक्षीदार म्हणून सही घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कमल भवारी यांनी जय किसान आदिवासी शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब धुमाळ यांच्याकडे सदर घटनेबाबत मदत मागितली असता धुमाळ यांनी जिल्हाधिकाºयांसह संबंधित अधिकाºयांना निवेदन देत पीडितम हिलेला न्याय देऊन तिचा हिस्सा असलेली जमीन परत मिळावी म्हणून मागणी केली.
वारस कमल भवारी यांना एजंटमार्फत जिवे मारण्याची धमकी दिली जात असून, सदर वारस एकटी असल्याने झालेला व्यवहार रद्द करावा व फसवणूक करणाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जय किसान आदिवासी शेतकरी संघटनेने केली आहे.

Web Title: Report that the heirs of the deceased have been deceived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.