कळवण - खर्डे बस पूर्ववत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 05:24 PM2021-01-16T17:24:50+5:302021-01-16T17:26:33+5:30
खर्डे : परिसरात तब्बल दहा महिन्यापासून बंद असलेली कळवण आगाराची कळवण - हनुमंतपाडा (खर्डे) बस शुक्रवारी (दि. १५) पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
खर्डे : परिसरात तब्बल दहा महिन्यापासून बंद असलेली कळवण आगाराची कळवण - हनुमंतपाडा (खर्डे) बस शुक्रवारी (दि. १५) पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. आता राज्य शासनाने कोरोना महामारीचा आजार आटोक्यात आल्याने हळूहळू सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बस सेवाही उपलब्ध करून दिली आहे . कळवण आगाराने खर्ड-हनुमंतपाडा बस सेवा शुक्रवार दि. १५ पासून सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी गावात बस येताच चालक व वाहकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरू असलेली बस सेवा कोरोना काळात बंद झाल्याने नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण झाली होती. तब्बल दहा महिन्यानंतर गावात बस आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गावात बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी एसटी बस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी वार्शीचे सरपंच बळीराम वाघ, आप्पा सावकार, भास्कर माळी, बबन शेवाळे, पुंजाराम निरभवणे, अशोक शेवाळे, लखन निरभवणे, मधु माळी, खर्डे येथे हर्षद मोरे, डॉ. जगदीश जाधव, विष्णू जाधव, ऊत्तम गवारे ,सुभाष देवरे, हेमंत गांगुर्डे, नाना आहेर, शशी लोखंडे, पपु देवरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.