सरपंच सेवा महासंघाचे ग्रामविकासमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:47 PM2020-02-13T22:47:58+5:302020-02-14T00:45:23+5:30
सरपंच सेवा महासंघाचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यस्तरीय शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
जळगाव नेऊर : सरपंच सेवा महासंघाचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यस्तरीय शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
सरपंच सेवा महासंघाच्या २१ कलमी मागण्यांसह पक्षांतरबंदी कायदा ग्रामपंचायत सदस्यांनाही लागू करण्याबाबत ग्रामविकासमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. शासन सरपंचांच्या मागण्यांसंदर्भात अनुकूल असून, लवकरच राज्यातील निवडक सरपंचांची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिला. यावेळी भाऊसाहेब कळसकर, राहुल उके, कार्याध्यक्ष माधव गंभिरे, राज्य सल्लागार हनुमंत सुर्वे, रामनाथ बोराडे, कोअर कमिटीचे अध्यक्ष पंजाब चव्हाण, बालाजी बोबडे, कपिल देवके, भारत आव्हाड, मोरेश्वर लोहे, लक्ष्मी चांदणे, सुप्रिया मुनेश्वर, प्रशांत किलनाके, भाऊसाहेब गिराम, सुनील रहाटे, प्रवीण साठे आदी उपस्थित होते.