पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे पाठविणार
By admin | Published: July 6, 2017 12:28 AM2017-07-06T00:28:14+5:302017-07-06T00:28:33+5:30
दिलीप देवरे : परमोरीतील प्रदूषणामुळे नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे परमोरी परिसरातील पूर्व भागातील द्राक्षबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती कळवणचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी दिली.
परमोरी परिसरातील द्राक्षबागांची देवरे यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. संबधित विभागाकडे अनेकवेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने तालुक्यातील परमोरी येथील सरपंच सिंधूबाई दिघे, उपसरपंच विलास काळोगे, पोलीस पाटील, सुभाष शिवले, संजय काळोगे, पुंडलिक जाधव, विनायक जाधव आदी बाधित शेतकऱ्यांनी तक्र ार केली आहे. संबंधित विभागाच्या वतीने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
कळवण उपविभागिय कृषीधिकारी दिलिप देवरे ,दिंडोरी तालूका कृषी अधिकारी विलास सोनवणे, पंचायत समतिी कृषी अधिकारी डी. सी. साबळे ,यांनी बाधित द्राक्षबागाची पहाणी करून, पंचनामे केले असून, सदर नुकसानिचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.दिंडोरी तालूक्यातील अनेक ठिकाणी वायूप्रदूषण करणाऱ्या कंपन्या असून, रात्री-अपरात्री वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, शेतपिके तसेच द्राक्षबागांचे पाने करपणे, नव्यानेच छाटणी करण्यात आलेल्या द्राक्षबागावर विपरीत परिणाम होत असून, द्राक्षबागा वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात महागडी औषधे फवारणी करावी
लागत आहेत. नुकसानग्रस्त व बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.