कळवणला रात्रीतून फोडली सात घरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:41+5:302021-07-31T04:14:41+5:30

कळवण : शहरात बुधवारी पहाटे दोन ते चार या वेळेत सात ठिकाणी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लुटण्यात आल्याने नागरिकांमध्ये ...

Reportedly, seven houses were blown up overnight! | कळवणला रात्रीतून फोडली सात घरे !

कळवणला रात्रीतून फोडली सात घरे !

Next

कळवण : शहरात बुधवारी पहाटे दोन ते चार या वेळेत सात ठिकाणी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लुटण्यात आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, एका घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या टोळ्यांतील एक चोरटा टिपला गेला आहे. त्याने संगमनेर येथेदेखील घरफोडी केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनाही काही घरांत ठसेतज्ज्ञांकडून चोरांच्या हातांचे ठसे उपलब्ध झाले आहेत. कळवण पोलिसांकडून घरफोडीबाबत गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. सात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी चोरांनी हाथ साफ केल्यामुळे कळवण शहरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, महागडे कपडे, साड्या व रोकड असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. गांधी चौकातील सुनील देवघरे, वड गल्लीतील सुरेश जंगम, युवराज मालपुरे, सुभाष पेठेतील बाबुलाल महाजन, लोकमान्य टिळक चौकातील प्रभाकर कोठावदे, नवीन ओतूर रोड, पाण्याची टाकी परिसरातून जाकीर शेख, निकम मॅडम या सात जणांची घरे चोरट्यांनी फोडली. ही घरे गेल्या आठ ते १५ दिवसांपासून बंद होती. चोरट्यांनी पाळत ठेवून हात साफ केल्याचा अंदाज आहे .

------------------

बंद घरे चोरट्यांचे लक्ष्य

कळवणच्या सुभाषपेठेतील बाबुलाल महाजन यांच्या घराबाहेरील दोन ठिकाणी सीसीटीव्हीत एका चोराची हालचाल कैद झाल्याचे आढळून आले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार हिंमत चव्हाण, हवालदार भोये, अनिल निकम, नाईक शरद शिंदे यांच्या पथकाने पंचनामा करीत तपास सुरू केला आहे. बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची बंद घरे चोरट्यांचे लक्ष्य होतात. त्यामुळे त्यांनी पाळत ठेवून एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

---------------------

सीसीटीव्हीत आढळलेल्या एका संशयिताचा संदर्भ लागल्यास कळवण पोलिसांशी संपर्क साधावा. नागरिकांनी काळजी घ्यावी व कोणाबद्दल संशय आल्यास पोलिसांना कळवावे. लवकरच तपासात यश येईल.

-प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक, कळवण

Web Title: Reportedly, seven houses were blown up overnight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.