कोरोना रु ग्णाशी संपर्कात आलेल्या बाराही जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:42 PM2020-05-17T22:42:41+5:302020-05-18T00:14:39+5:30
नांदगाव : तालुक्यातील संशयित कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या बाराही जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील यंत्रणेसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : तालुक्यातील संशयित कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या बाराही जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील यंत्रणेसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खबरदारी म्हणून या बाराही जणांना सारताळे येथील ग्रामीण विकास संस्थेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पाच दिवसांपूर्वी तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची एंट्री झाल्याच्या शक्यतेने ग्रामस्थांसह यंत्रणाही कमालीच्या तणावाखाली होती.
आमोदे येथील एका ५८ वर्षीय पुरु षाची पाठ दुखत असल्याने त्याला चाळीसगाव व नंतर नाशिक येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. नाशिकच्या रु ग्णालयात त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. यामुळे सतर्कझालेल्या यंत्रणेने चाळीसगाव रु ग्णालयातील डॉक्टर्स-कर्मचारी अशा वीस जणांचे स्वॅब तपासणीसाठी धुळे येथे पाठविले होते. ते निगेटिव्ह आले. दरम्यान रुग्णाची दोन्ही मुले व कुटुंबातील १० सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती नांदगाव पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी दिली.
आरोग्य विभागामार्फत सारताळे येथील ग्रामीण विकास संस्थेच्या इमारतीत शंभर रु ग्णांसाठी विशेष विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. आमोदे येथील उद्भवलेल्या आपत्कालीन घटनेत आमदार सुहास कांदे यांनी ग्रामस्थांसाठी सहकार्य केले.मालेगावी आणखी सात बाधित मालेगाव : शहरात कोरोनाबाधितांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे. तपासणीसाठी पाठविलेल्या स्रावाच्या नमुन्यांपैकी आज पुन्हा ७ बाधित रुग्णाचे अहवाल आले. मालेगाव शहरातून जितक्या वेगाने बाधित कोरोनामुक्त म्हणून लोकांना घरी सोडण्यात येत आहे त्याच वेगाने पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांत घबराट पसरली आहे.
सध्या असणारे लॉकडाउन आणि बाधित रुग्णांची वाढती संख्या यामुळे दहशतीत असणारे नागरिक घराबाहेर निघणे टाळत असले तरी रुग्णाची संख्या कमी होत नसल्याने घबराट कायम आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्युदर साडेपाच टक्के असल्याचा दावा मनपा आरोग्य विभाग करीत असला तरी पुन्हा बाधित मिळून येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. रविवारी आलेल्या अहवालात ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात सहा महिला आणि एका ३६ वर्षीय इसमाचा समावेश आहे.