तांत्रिक अहवालानंतरच पाणीकपातीचा फेरविचार
By admin | Published: March 5, 2016 11:20 PM2016-03-05T23:20:03+5:302016-03-05T23:57:43+5:30
आयुक्तांची माहिती : महापालिकेमार्फत टॅँकरचे नियोजन
Next
नाशिक : शहरात सध्या विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद असला तरी त्यात अनेक अडचणी उद्भवत असल्याने बव्हंशी नागरिकांकडून आठवड्यातून संपूर्ण एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत अभियंत्यांकडून तांत्रिक अहवाल मागविण्यात आला असून, येत्या दोन दिवसांत फेरविचार करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, शहरात पाणीटंचाईच्या भागात प्रशासनामार्फत टॅँकरची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली.