कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Published: February 25, 2016 10:05 PM2016-02-25T22:05:59+5:302016-02-25T22:08:23+5:30

कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Representation to Deputy Collector for Kandi Damage | कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next

 इगतपुरी : नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाची मोठी लागवड झाली असून, सध्या कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी बेजार झाला आहे. शासनाने हमीभाव द्यावा या मागणीचे निवेदन स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.
नाशिक जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यात तब्बल ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर, शेतमालाचे भाव, शेतीविषयक चुकीचे धोरण, निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, बाजार हस्तक्षेप योजना लागू करून शासनाने कांदा खरेदी करावा, कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रु पये भाव द्यावा, रब्बी कांद्याची देशात मोठी लागवड असल्याने इतर देशांबरोबर लवकरात लवकर करार करावे, प्रस्तावित कांदा चाळीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळावे, हरणबारी धरणाचे डाव्या व उजव्या कालव्याचे काम त्वरित सुरू करावे, मोसम, आरम, गिरणा नदीवर केटीवेअर बंधारे बांधावेत, डाळींब उत्पादकांना २०१४ ते २०१६ पर्यंतचे दुष्काळी पॅकेज मिळावे आदि मागण्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, जिल्हा संघटक हंसराज वडघुले पाटील, नितीन रोठे पाटील, रतन मटाले, श्रावण देवरे, रवींद्र शेवाळे, रवींद्र पगार, अण्णा शेवाळे, निवृत्ती खालकर, हरिभाऊ ताजने, सुभाष जगळे, दादाजी शेवाळे, भाऊसाहेब कातकाडे, अरुण शेवाळे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Representation to Deputy Collector for Kandi Damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.