‘पोस्टर्स बॉइज’ मनपा अधिकाºयांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:16 AM2017-09-16T00:16:32+5:302017-09-16T00:16:36+5:30

राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध प्रकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार व जाहिरात करताना महापालिकेतील कोणत्याही अधिकाºयाला स्वत:चे छायाचित्र झळकविण्यास शासनाने मनाई केली आहे. शासन निर्णय डावलून जाहिरातीत झळकणाºया ‘पोस्टर्स बॉइज’ अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 Representatives of 'Posters Boys' | ‘पोस्टर्स बॉइज’ मनपा अधिकाºयांना तंबी

‘पोस्टर्स बॉइज’ मनपा अधिकाºयांना तंबी

Next

नाशिक : राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध प्रकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार व जाहिरात करताना  महापालिकेतील कोणत्याही अधिकाºयाला स्वत:चे छायाचित्र झळकविण्यास शासनाने मनाई केली आहे. शासन निर्णय डावलून जाहिरातीत झळकणाºया ‘पोस्टर्स  बॉइज’ अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य शासनामार्फत अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा प्रसार, प्रचार करण्यासाठी महापालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लावले जातात शिवाय जाहिरातही केली जाते. या जाहिरातींत प्रामुख्याने महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांचे छायाचित्र झळकविले जाते, तर सोबत प्रशासन प्रमुख आयुक्तांचेही छायाचित्र टाकण्याचा पायंडा पडलेला आहे. या जाहिरातबाजीबाबत महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन २०१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेषाधिकार भंगाच्या सूचनेवर चर्चा झाली होती. त्यावेळी वित्तमंत्र्यांनी सदर जाहिरातबाजीबाबत कारवाई करण्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार शासनाच्या नगरविकास विभागाने परिपत्रक काढले असून, त्याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. परिपत्रकानुसार, विविध प्रकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार व जाहिरात करताना कोणत्याही अधिकाºयांनी स्वत:चा फोटो
टाकू नये याबाबत दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. प्रशासनाने त्याबाबतचे परिपत्रक सर्व खातेप्रमुखांना पाठविले असून, काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title:  Representatives of 'Posters Boys'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.