परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात; भारत मातेचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:05 AM2019-01-28T00:05:36+5:302019-01-28T00:06:40+5:30
भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत प्रभातफेरी काढून विविध कार्यक्र मांनी परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
नाशिक : भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत प्रभातफेरी काढून विविध कार्यक्र मांनी परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मनपा शाळा पाथर्डीगाव, मनपा शाळा प्रशांतनगर, तसेच ज्येष्ठ नागरिक संघ, पाथर्डी फाटा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी नगरसेवक तथा शिक्षण मंडळ सदस्य सुदाम डेमसे, नगरसेवक भगवान दोंदे, नगरसेवक संगीता जाधव, नगरसेवक पुष्पा आव्हाड, सोसायटीचे अध्यक्ष संजय डेमसे, चेतन चुंभळे, शिवसेना पक्ष पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक आबा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक रोहित शिंदे, विकास लोंढे, संदीप बोडके यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ, संचलित डे केअर सेंटर शाळेत ध्वजारोहण डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अॅड. आप्पासाहेब उगावकर, सचिव गोपाळ पाटील, सहसचिव अॅड. अंजली पाटील, संचालक अनिल भंडारी, वसंतराव कुलकर्णी, अजय ब्रह्मेचा, छाया निखाडे, अॅड. मुग्धा सापटणेकर, मुख्याध्यापक शरद गीते, माधुरी मरवट, विद्या अहिरे, पूनम सोनवणे उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सूचितानगर मित्रमंडळाच्या वतीने इंदिरानगर जॉगिंग ट्रैक, भारत मातेचे पूजन व ध्वजारोहण सिटी गार्डनसमोर आले. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सरप्रित सिंग बल, सद्दाम शेख, प्रतीक मोटकरी, अश्विन देसले, सौरभ बविस्कर, कौशिक पाटील बिरारी, ऱफिक सय्यद हर्शल जाधव व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
सरस्वती पाटील विद्यालय
सिडको येथील पाटीलनगरमधील श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात सकाळी संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष केशवराव पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश कोठावळे, बाळासाहेब लोंढे, राम पाटील, दीपिका पाटील, निवेदिता पाटील, श्याम पाटील, भरत पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी रंगीत कवायत सादर केली. त्यानंतर कार्यक्र माचे अध्यक्ष पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले. सूत्रसंचालन किरण शिरसाठ
यांनी केले. प्रास्ताविक गोलाईत यांनी केले. मुख्याध्यापक सुनील बिरारी यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक वाकचौरेंसह पालक उपस्थित होते.