राष्टÑ प्रजासत्ताक, पण भांडवलदारांच्या सोयीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:29 AM2018-01-26T00:29:09+5:302018-01-26T00:30:39+5:30

नाशिक : देशाने प्रजासत्ताक राज्य घटना स्वीकारून ६८ वर्षे झाली. देशाच्या विकासाचा वारूही चौफेर उधळला. परंतु त्याचबरोबर देशातील सामाजिक, जातीय आणि राजकीय घडामोडींमधील बदलामुळे अनेकदा शंका निर्माण झाल्या.

The Republic of the Republic, but the capitalists! | राष्टÑ प्रजासत्ताक, पण भांडवलदारांच्या सोयीचे!

राष्टÑ प्रजासत्ताक, पण भांडवलदारांच्या सोयीचे!

Next
ठळक मुद्देतरुणाई मात्र स्पष्ट बोलणारी डिजिटल ग्राम करण्याचा संकल्प

नाशिक : देशाने प्रजासत्ताक राज्य घटना स्वीकारून ६८ वर्षे झाली. देशाच्या विकासाचा वारूही चौफेर उधळला. परंतु त्याचबरोबर देशातील सामाजिक, जातीय आणि राजकीय घडामोडींमधील बदलामुळे अनेकदा शंका निर्माण झाल्या. देशात लोकशाही आहे आणि लोकशाही हवीच किंंबहुना प्रजासत्ताक घटना चिरायुच असेल असा विश्वास सर्वांच्या मनात असला तरी प्रजेला त्यांच्या अधिकारांचा कितपत उपयोग होतो यासह विविध प्रश्नांबाबत तरुणाई मात्र स्पष्ट बोलणारी आहे. ‘लोकमत’ने केलेल्या सर्र्वेक्षणात तरुणाईने देशात प्रजासत्ताक आहे, परंतु खरी सत्ता भांडवलदार आणि त्याखालोखाल राजकारण्यांच्या हाती आहे, अशा भावना व्यक्त केल्या. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असली तरी हे स्वातंत्र्य घटनेने दिले असून ते अबादीतच आहे, असेही मत व्यक्त करण्यात आले.
देशातील सध्याच्या व्यवस्थेबद्दल वेगळेच वातावरण तयार होत आहे. विचारवंतांची मतमतांतरे काही असली तरी या देशातील सामान्य तरुणाला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. त्यातच भारतात सध्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे नव्या पिढीच्या आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे टेक्नोसेव्ही असलेल्या तरुणाईला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी लोकमतने विविध महाविद्यालयांतील शंभर युवकांकडून प्रश्नावली भरून घेतली, त्याआधारे निष्कर्ष काढला असता या देशात काहीही झाले तरी युवकांना देशात भवितव्य असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. देशात सध्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, शहरात स्मार्ट सिटी सोडाच परंतु ग्रामीण भागातही डिजिटल ग्राम करण्याचा सरकारचा संकल्प आहे. देशातील शहरी-ग्रामीण व्यवस्था, आर्थिकस्तर, साक्षरता या सर्वच बाबी तपासल्या तर देशात डिजिटल क्रांती होण्यास अडचण नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जगात सर्वाधिक तरुणांची संख्या भारतात आहे. त्यामुळे भारताची तरुणांचा देश म्हणून ओळख असली तरी सध्या तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे. ही स्थिती सुधारण्याची गरज आहे. परंतु, सरकारकडून घेतल्या गेलेल्या आर्थिक निर्णयामुळे शेती क्षेत्रासह उद्योग व्यवसायांवरही विपरीत परिणाम झाल्याने त्याचा या देशातील कोट्यवधी तरुणाच्या भविष्यावर परिणाम झाल्याची प्रतिक्रिया नाशिकमधील तरुणांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून क्रांती घडवणे शक्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त तरुणांनी त्यासाठी सकारत्मक दृष्टिकोन बाळगून दीर्घकाळ काम करण्याची गरज व्यक्त केली.
आपल्या देशातील तरुणांचे देशावर नक्कीच प्रेम आहे. देशाचे स्वातंत्र्य किती मोलाचे आहे हे इतिहासात डोकावताना तर समजतेच पण रोज प्रसारमाध्यमातून देशाच्या सीमांवर अतिरेक्यांशी, दहशतवाद्यांशी सामना करताना शहीद झालेल्या वीरांच्या बातम्या वाचून, ऐकूनही अधोरेखित होते. पण राजकारणी लोक आणि पैशाच्या हव्यासापाई नागरिक ज्या चुकीच्या गोष्टी करत आहेत त्याचा तरुणाईला खूप राग येतो. त्यामुळे त्यांना दुसरे देश बरे वाटतात. डिजिटल इंडियाबाबत तरुणाई आशादायी आहे पण त्याचवेळी सायबर गुन्हेगारीचीही या तरुणाईला चिंता वाटते.

Web Title: The Republic of the Republic, but the capitalists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत