प्रजासत्ताकदिनी अश्लील गीतांवर धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:15 AM2018-01-28T01:15:35+5:302018-01-28T01:16:09+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको परिसरातील कामटवाडा भागात एका भोजपुरी मंडळाच्या वतीने आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अश्लील गीतांवर थिरकत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको परिसरातील कामटवाडा भागात एका भोजपुरी मंडळाच्या वतीने आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अश्लील गीतांवर थिरकत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कामटवाडेमधील डीजीपीनगर क्रमांक दोनच्या माउली लॉन्समध्ये भोजपुरी मंडळाच्या वतीने देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांवर पारंपरिक नृत्य सादरीकरणाऐवजी चक्क अश्लील नृत्याचा नजराणा सादर करण्यात आल्याने उपस्थितांनाही धक्का बसला. या कार्यक्रमाला विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवकमंडळी प्रेक्षकवर्गात उपस्थित होती. मंचावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकावर सर्व आयोजक समितीच्या पदाधिकाºयांची छायाचित्रेही चित्रीकरणातून झळकली. मंचावर तरुणींनी अश्लील प्रकारचे नृत्य के ले. या नृत्यावर काही प्रेक्षकांनी फिदा होऊन चक्क मंचावर जाऊन नोटाही उधळल्या; मात्र आयोजक समितीचे प्रमुख बी. एल. श्रीवास्तव यांनी या बाबीचे खंडण केले असून, असा कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचा दावाही केला आहे. भोजपुरी गीतांच्या चालीवर थिरकत तरुणींनी अश्लील नृत्य सादर केल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला असून, चक्क देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाच्या नावाखाली सिडको परिसरात डान्सबार भरविला गेल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. मंचावर कला सादर करणाºया तरुणींनी चक्क अश्लील प्रकारचे नृत्य सादर केल्याचे व्हायरल झालेल्या चित्रफितीमधून दिसते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्टÑभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी विविध राजकीय नेते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमात अशा कुठल्याही प्रकारे नोटांची उधळण झालेली नाही. कार्यक्रम भोजपुरी देशभक्तीपर गीतांचा होता.
- बी. एल. श्रीवास्तव, आयोजक