रिपब्लीकन जनशक्तीचा आघाडीला ११ जागांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 06:05 PM2019-08-09T18:05:30+5:302019-08-09T18:07:26+5:30

उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी आमची बांधीलकी असून, तशा विचारप्रणालीच्या पक्षांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीतही रिपब्लीकन आघाडीने दोन्ही कॉँग्रेस सोबत राहण्याचे ठरविले आहे

Republican manpower proposes six seats | रिपब्लीकन जनशक्तीचा आघाडीला ११ जागांचा प्रस्ताव

रिपब्लीकन जनशक्तीचा आघाडीला ११ जागांचा प्रस्ताव

Next
ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : शनिवारचा महामेळावा पूरामुळे स्थगित कलम रद्द करण्यासाठी संविधानीक आधार देण्याची गरज होती

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : येत्या विधानसभा निवडणूकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होवू नये यासाठी पिपल्स रिपब्लीकन पक्ष आणि पिपल्स रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडीया यांची एकत्रित रिपब्लीकन जनशक्ती आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीकडे अकरा जागांचा प्रस्ताव दिला असून, यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षीत असल्याची माहिती आघाडीचे संयोजक व पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी दिली. नाशिकमध्ये येत्या १७ आॅगस्ट रोजी होणारा महामेळावा राज्यातील पूर परिस्थीतीमुळे स्थगित करण्यात आल्याचेही ते म्हणाले.


नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रा. कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी आमची बांधीलकी असून, तशा विचारप्रणालीच्या पक्षांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीतही रिपब्लीकन आघाडीने दोन्ही कॉँग्रेस सोबत राहण्याचे ठरविले आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये हा त्यामागचा प्रयत्न आहे. या आघाडीत बहुजन वंचित आघाडी किंवा धर्मनिरपेक्ष विचारांचे आणखी कोणी आमच्या सोबत आले तर त्यांचे स्वागतच असेल. चळवळीतील सर्व नेत्यांनी अहंकार बाजूला ठेऊन सत्ताधारी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी एकत्रित आले पाहीजे. येत्या निवडणुकीत रिपब्लिकन आघाडीला ११ जागा मिळाव्यात असा प्रस्ताव कॉग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला आहे. त्यानुसार मतदारसंघनिहाय लवकरच बैठका घेण्यात येणार आहेत. काश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या विषयावर बोलताना प्रा. कवाडे यांनी, सदरचे कलम रद्द करण्यासाठी संविधानीक आधार देण्याची गरज होती. जम्मू -काश्मिरच्या राज्य सरकारने हे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असता, तरी हे रद्द झाले असते. यापुर्वी केंद्रशासित प्रदेशाचे राज्य झाले आहे. परंतु एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेश होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे असेही ते म्हणाले. याप्रसंगी शशिकांत उन्हवणे, गणेश उन्हवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Republican manpower proposes six seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.