इंग्रजी शाळांकडून नियमबाह्य शुल्क वसुली पालकांचे निवेदन : शाळांवर कारवाई करण्याची मागणी; प्रशासन अधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:34 AM2018-04-04T00:34:53+5:302018-04-04T00:34:53+5:30

नाशिकरोड : शहरातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांनी सध्या पालकांकडून बेकायदेशीर फी वाढ करण्याचे सत्र सुरू केले आहे. तसेच पुस्तके, गणवेश, वह्या विक्री करून अतिरिक्त लूट करीत आहे.

Request for action on schools; Reports of unauthorized fees from English schools; Order to Administration officials | इंग्रजी शाळांकडून नियमबाह्य शुल्क वसुली पालकांचे निवेदन : शाळांवर कारवाई करण्याची मागणी; प्रशासन अधिकाऱ्यांना आदेश

इंग्रजी शाळांकडून नियमबाह्य शुल्क वसुली पालकांचे निवेदन : शाळांवर कारवाई करण्याची मागणी; प्रशासन अधिकाऱ्यांना आदेश

Next
ठळक मुद्देउपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार शैक्षणिक वर्षामध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना न करणे

नाशिकरोड : शहरातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांनी सध्या पालकांकडून बेकायदेशीर फी वाढ करण्याचे सत्र सुरू केले आहे. तसेच पुस्तके, गणवेश, वह्या विक्री करून अतिरिक्त लूट करीत आहे. याबाबत मंगळवारी केम्ब्रिज शाळेच्या पालकांनी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे ठिय्या मांडला. शैक्षणिक वर्षामध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना न करणे, शिक्षक संघाची स्थापना कायद्यातील तरतुदीनुसार न करणे, दरवर्षी बेकायदेशीर फीमध्ये वाढ करणे, सत्र फी शुल्क विनियम कायद्यानुसार न घेता ५ ते ६ पट जास्त घेणे, फी व्यतिरिक्त कॉम्प्युटर फी, अ‍ॅक्टीव्हिटी फी या नावाने बेकायदेशीर फी वसूल करणे, शाळेच्या आवारात बेकायदेशीर पुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्याची विक्री करणे, याबाबत केम्ब्रिज शाळेच्या पालकांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. यावेळी जाधव यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. यावेळी उपसंचालक जाधव यांनी महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना बोलावून त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी योगेश पालवे, राजेश बडनखे, महेंद्र पाटील, सविता खैरनार, केतन पानसरा, प्रशांत सावळे, अंकुश डोलाई, सीया केसवाणी, यश शहा, साधना पाटील, क्षितिज सुरवाडे, भागेश मोदी, विलास पाटील, गणेश सोनवणे आदींसह महिला पालकदेखील उपस्थित होते.

Web Title: Request for action on schools; Reports of unauthorized fees from English schools; Order to Administration officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा