छात्रभारतीचे महाविद्यालय प्रवेश शुल्क रचनेबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 05:42 PM2019-06-26T17:42:32+5:302019-06-26T17:43:06+5:30
सिन्नर- महाविद्यायीन विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवार रोजी छात्रभारतीतर्फे सिन्नर महाविद्यालया देण्यात आले.
निवेदनात ६ मार्च १९८६ च्या कायदानुसार मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षण हक्क कायदा तत्काळ अंमलबजावणी करावी, महाविद्यालयात रॅगिंग नावाचा प्रकार तत्काळ रोखण्यासाठी एकूण सुरक्षाव्यवस्थेत बदल करावा, बेकायदा शुल्क म्हणजे कॅपीटेशन अॅक्ट, विकास निधी, जिमखाना, बोनाफाईड, इंटरनेट, मॅगझिन, तसेच सीसीटीव्ही व इतर सुविधांच्या नावाखाली घेतलेले शुल्क तत्काळ करत करावे, विनाअनुदान महाविद्यालयाची शुल्कधारणा शिक्षण अधिकारी यांच्या आदेशानुसार एकाच स्तरावरची असावी, पॅटर्न फी बेकायदा वसुल केलेली असून, ती तत्काळ परत करावी या विषयांबाबत सकारात्मक चर्चा करून येत्या पाच दिवसांत अहवाल सादर करावा अन्यथा महाविद्यालय प्रशासनविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी छात्रभारती संघटेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सुर्ववंशी, नाशिक शहराध्यक्ष सदाशिव गणगे, तालुका समन्वयक ताराचंद रूपवते, कल्याणी मनोहर, दत्तू भांगरे, मारूती नेटावटे, जनार्दन खेताडे, आकाश जगताप, साक्षी रूपवते, अश्विनी सोनवणे, ऋतुजा पवार उपस्थित होते.