कर्ज माफ करण्यासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:55 IST2020-01-05T23:54:39+5:302020-01-05T23:55:10+5:30
चापडगाव येथील नवचंडिका जलसिंचन उपसा योजनेचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीसोबत माफ व्हावे या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी डोकफोडे यांना देण्यात आले आहे.

चापडगाव उपसा योजनेचे कर्ज माफ करण्यासाठी उपजिल्हाधिकारी डोकफोडे यांना निवेदन देताना विलास सांगळे, दिलीप केदार, सुभाष आव्हाड आदी.
सिन्नर : तालुक्यातील चापडगाव येथील नवचंडिका जलसिंचन उपसा योजनेचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीसोबत माफ व्हावे या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी डोकफोडे यांना देण्यात आले आहे.
सदर कर्जे सातबारावर असल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यासाठी कुठलीही बँक तयार होत नाही. त्यामुळे शेतकºयांना शेतीच्या विकासासाठी कर्ज उपलब्ध होत नाही आणि शेतीचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात घेता येत नाही. चापडगाव येथील नवचंडिका जलसिंचन उपसा योजनेत थकीत कर्ज माफ करण्यात आलेले नाही याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. निवेदन देताना विलास सांगळे, दिलीप केदार, सुभाष आव्हाड यांच्यासह महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.