कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 05:44 PM2019-01-12T17:44:01+5:302019-01-12T17:44:17+5:30
सिन्नर : राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी विविध संघटनांनी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले.
सिन्नर : राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी विविध संघटनांनी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले.
नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनाचे उपाध्यक्ष टी. एस. ढोली, सिन्नर तालुका कनिष्ठ महाविद्याालयीन शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष आर. टी. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गवळी यांना निवेदन देण्यात आले. सर्व शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे राज्य शासनाचा वाटा १० टक्क्यांवरून १४ टक्के करून तो कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, कायम विनाअनुदानित मुल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी जाहीर करून अनुदान द्यावे अशा ३४ मागण्या शिक्षक संघटनेने राज्य शासनाकडे केल्या आहेत. यात महिन्याच्या दुसºया टप्प्यातील आंदोलनात १८ जानेवारीला जिल्हाभरातील शिक्षक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करणार आहेत. ३० जानेवारीला विभागीय कार्यालयावरर मूकमोर्चा काढण्यात येणार असल्याचे ढोली यांनी सांगितले.