महापौरांची विनंती; आयुक्तांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:03 AM2018-06-15T01:03:10+5:302018-06-15T01:03:10+5:30

नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागतासाठी खर्च करण्यास प्रशासनाने नकार दिल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी आयुक्तांना विनंतीपत्र पाठविले खरे, परंतु शासनाच्या आदेशाची प्रत जोडून आयुक्तांनी ते माघारी प्रशासनाला पाठविले आहे. त्यामुळे भाजपात याची तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, निवडणूक आचारसंहितेनंतर आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

Request of mayor; Commissioner's Denial | महापौरांची विनंती; आयुक्तांचा नकार

महापौरांची विनंती; आयुक्तांचा नकार

Next
ठळक मुद्देपालखी सोहळा : आचारसंहितेनंतर वाद पेटण्याची शक्यता यासंदर्भात काही पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये खलही सुरू झाला आहे.

नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागतासाठी खर्च करण्यास प्रशासनाने नकार दिल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी आयुक्तांना विनंतीपत्र पाठविले खरे, परंतु शासनाच्या आदेशाची प्रत जोडून आयुक्तांनी ते माघारी प्रशासनाला पाठविले आहे. त्यामुळे भाजपात याची तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, निवडणूक आचारसंहितेनंतर आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.
संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी येत्या २९ जून रोजी नाशिक शहरात येणार असून त्याचे महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्याची अपेक्षा स्वागत समितीला होती. परंतु मीरा भार्इंदर महापालिकेच्या संदर्भात एका जनहित याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने महापालिकेचा अधिनियम तपासूनच खर्च करण्याचे आदेश दिले आहे. म्हणजेच अधिनियमातील तरतुदीनुसार कोणत्याही प्र्रकारच्या सण, उत्सवावर खर्च करण्यास मनाई असणार आहे. त्यामुळे महापालिकेने तसे उत्तर पालखी समितीला दिल्यानंतर राजकीय पक्षांचा सुप्त संघर्ष आणखी वाढीस लागला.
महापौरांनी यासंदर्भात आयुक्त मुंढे यांना पत्र पाठवून दरवर्षीप्रमाणे स्वागतासाठी खर्च करण्याची विनंती करणारे पत्र सादर केले होते. मात्र त्यास आयुक्तांनी शासनाच्या आदेशाची प्रत प्रत्युत्तरादाखल पाठविली असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे. पालिकेत सत्ता असताना स्वागत सोहळ्यासाठी अवघ्या तीन ते चार लाख रुपयांच्या खर्चाचेही अधिकार नसल्याने ही अस्वस्थता वाढली आहेच, शिवाय विरोधकांनीदेखील अस्वस्थतेत भर घातल्यानंतर आता आदर्श आचारसंहितेनंतर संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काही पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये खलही सुरू झाला आहे.

Web Title: Request of mayor; Commissioner's Denial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.