प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक भारतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 05:08 PM2018-11-18T17:08:54+5:302018-11-18T17:13:35+5:30

राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर  नोकरभरती करण्यासोबतच विना अनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना  जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

   Request for the pending demands of District Collector | प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक भारतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक भारतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next
ठळक मुद्देविना अनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याची मागणी शिक्षकांना  जुनी पेंशन योजना लागू करावी नाशिक जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : राज्यातील शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर  नोकरभरती करण्यासोबतच विना अनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना  जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 
राज्यातील शिक्षकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्यांकडे दुलक्ष करीत असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले.  राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिक्षकांची भरती करण्यासोबत खासगी क्षेत्रात अफेर मॅटिव्ह अ‍ॅक्शन कायदा लागू करावा, विना अनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी, कला क्रीडा शिक्षक पुनर्स्थापना करणे, खाजगीकरण बंद करणे, पूर्णवेळ ग्रंथपाल नेमणे आदि मागण्यांही शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्या आहेत. शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारिणी ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाग देताना नासिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व संयुक्त कृती समितीतर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यलयात निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडेकर यांना शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष के. के. अहिरे,राज्य पदाधिकारी शेलार,विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, सी. बी. पवार, जयवंत भाबड, चंद्रशेखर शेलार, कैलास पगार, प्रकल्प पाटील,पुष्पां गांगुर्डे,विजया पाटील आदि शिक्षक उपस्थित होते. 

Web Title:    Request for the pending demands of District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.