निवेदन : मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा देण्याची मागणी सिन्नर तहसीलवर आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:40 AM2018-01-31T00:40:31+5:302018-01-31T00:41:04+5:30
सिन्नर : विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला.
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रमुख मागणीसह आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष लकी जाधव, पवन सोनवणे, विजय बर्डे, किरण मोरे, संजय पवार, वैभव सोनवणे, रतन सोनवणे, नितीन मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असली तरी सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व संशयितास फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. सिन्नर व निफाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळाले पाहिजेत, आदिवासी बांधवांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे व विंचूरदळवी येथील प्रकरणात अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना देण्यात आले. येथील महात्मा फुले पुतळ्यापासून आदिवासी समाजबांधवांच्या आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. जोरदार घोषणाबाजी देत गणेशपेठेतून मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यातून हजारो आदिवासी समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाच्या आवारात छोटेखानी सभा झाली.
आदिवासी समाजावर अन्याय झाल्यानंतर कोणीही राजकारणी पुढे येत नसल्याची खंत उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष लकी जाधव यांनी व्यक्त केली. आदिवासी समाजबांधवांच्या भावना तीव्र आहेत. शासन जातीयवादी नसेल तर सदर खटला तातडीने जलद न्यायालयात चालविला जाईल, असे जाधव यांनी सांगितले. अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.
सनदशीर मार्गाने प्रश्न सुटत नसेल तर...
लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आदिवासी समाजबांधवांनी मोर्चा काढून शासन दरबारी जाब मागण्याचा प्रयत्न केला असल्याचे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले; मात्र न्याय मिळणार नसेल तर शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकण्यात येईल. विंचूरदळवीच्या तपासात त्रुटी राहता कामा नये. आदिवासी बांधव शिक्षण व बुद्धिमत्तेची लढाई एकवेळ हारतील; मात्र दोन हाताच्या लढाईत आदिवासी समाज आजपर्यंत हरला नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ४-५ दिवसात या मोर्चाची दखल घेऊन मागण्या मान्य न झाल्यास नाशिक येथे मोर्चा काढण्याचा इशारा ढवळे यांनी दिला. त्यानंतर मुंबई येथे मोर्चासाठी समाजबांधवांनी तयार राहावे, असे ढवळे यांनी सांगितले.